‘दिलखुलास’ कार्यक्रमात मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ या कार्यक्रमात मराठी भाषा व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या अॅपवर शुक्रवार दि.१० आणि शनिवार दि.११ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ पत्रकार व निवेदक सचिन परब यांनी ही मुलाखत घेतली आहे.

            प्रबोधन नियतकालिकाला यंदा १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या नियतकालिकाची आतापर्यंतची वाटचाल तसेच या नियतकालिकाचे संस्थापक – संपादक दिवंगत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे सामाजिक व साहित्यिक कार्य या विषयावर ही मुलाखत घेण्यात आली आहे. प्रबोधनमधील प्रबोधनकारांचे लेखअप्रकाशित साहित्य जनतेसमोर आणण्याची संकल्पनाहुंडाबंदीसाठी केलेले प्रयत्नप्रबोधन नियतकालिकाची शताब्दी साजरी करताना राबविण्यात येणारे विविध उपक्रम आदी विषयांची सविस्तर माहिती मराठी भाषा मंत्री श्री.देसाई यांनी दिलखुलास‘ या कार्यक्रमातून दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

गुरुवारी ५ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

Thu Dec 9 , 2021
नागपूर :  नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता. ९ डिसेंबर) रोजी ०५ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३०,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. त्यांनी मनपाच्या लसीकरणाबद्दल नियमांची माहिती दिली आणि सांगितले की लसीचे डोज घेणा-यांनाच प्रवेश दयावा अन्यथा कारवाईस पात्र राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com