मुंबई, दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या अॅपवर शुक्रवार दि. २४ आणि शनिवार दि. २५ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना, स्थापनेमागचा उद्देश, राबविण्यात येत असलेले उपक्रम, महिलांसाठीचे प्रशिक्षण, नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्प आदी विषयांची माहिती श्रीमती ठाकरे यांनी ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमातून दिली आहे.