संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र शासनाने ग्रामीण जनतेच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तर काही ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय सुरू केले आहेत त्यातील विदर्भातील जी काही ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आहेत त्यातील सर्वात मोठे उपजिल्हा रुग्णालय म्हणून कामठी च्या उपजिल्हा रुग्णालयाची ओळख आहे.समाजातील गोरगरीबासाठी सुरू असलेले 50 खाटाचे रुग्णालय हे 100 खाटात विस्तारित करण्यात आले.ग्रामीण जनतेला कमी खर्चात दर्जेदार आरोग्य सेवा मिळा वी यासाठी शासन प्रामुख्याने लक्ष पुरवीत असली तरी या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे क्वार्टर हे मागील दहा वर्षांपासून जीर्णावस्थेत झाले असून हे क्वार्टर पाडण्याचे काम सुरू होणार आहे ज्यामुळे या रुग्णालयाचे एकूण डॉक्टर ,अधिकारी ,कर्मचारी पैकी बोटावर मोजणारे कर्मचारी शासनाच्या मुख्यालयी राहण्याच्या आदेशाचे पालन करीत आहेत.
लाखोंच्या लोकसंख्या असलेल्या कामठी शहरात पूर्वीपासून आरोग्याशी संबंधित शासकीय रुग्णालय तसेच खाजगी डॉक्टरांचा अभाव असल्याने येथील प्रसिद्ध उद्योगपती सेठ रामनाथ लोहिया आणि स्व रायसाहेब हिरालाल शुक्ला यांनी सन 1934 मध्ये ग्रामीण कुटीर रुग्णालयाची स्थापना केली होती.ज्याचे उदघाटन तत्कालीन गव्हर्नर सर हँडगोवन यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 1934 रोजी करण्यात आले होते.ते या कार्यक्रमाला सपत्नीक उपस्थित होते.रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयाची जवाबदारी नगर परिषद कडे सोपविण्यात आली होतो.त्यानंतर हे रुग्णालय राज्य शासनाच्या अखत्यारीत आल्याने या कुटी रुगनालयाचे नाव बद्दलवुन ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय असे झाले त्यावेळी या रुग्णालयात फक्त 30 खाटाची व्यवस्था होती.अपुरी रुग्ण व्यवस्था लक्षात घेऊन माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या अथक प्रयत्नातून हे रुग्णालय 30 खाटाहून 50 खाटाचे करून आधुनिक सोयी सुविधा मिळावे यासाठी 19 डिसेंबर 1999 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर,माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तर जून 2004 मध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ खालीतूल्लाह यांच्या हस्ते लोकार्पण होऊन 50 खाटाच्या रुग्णालयासह आधुनिक पद्धतीच्या रुग्णसेवेची व्यवस्था सुरू करण्यात आली.
शासनाने कामठी उपजील्हा रुग्णालयाच्या या आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी वर्ग 1 व वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान आहेत मात्र हे निवासस्थान राहण्यायोग्य नसून जीर्णावस्थेत पडक्या अवस्थेत आहेत.. तेव्हा या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थांनाच्या दुरावस्थेकडे शासनाने लक्ष पुरवावे अशी मागणी जोर धरत आहे.