पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम उषा प्रकल्पाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डिजिटल लॉंचिंग

– या प्रकल्पाच्या माध्यमातून गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटींचा निधी!

गडचिरोली :- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पी एम- उषा) योजनेला मंजूरी दिली आहे, ज्याचा एकूण खर्च रु. १२,९२६.१० कोटी इतका आहे. राज्य सरकारी विद्यापीठे आणि महाविद्यालयांना समानता, प्रवेश आणि उत्कृष्टतेची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करण्यासाठी निधी पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे.

या योजनेच्या प्रकल्प मंजुरी मंडळाने १७ आणि १८ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या पहिल्या बैठकीत बहु-विषय शिक्षण आणि संशोधन विद्यापीठे घटकांसाठी विद्यापीठांना मान्यता दिली आहे.

त्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाला १०४ कोटींचा निधी प्राप्त झालाय.

*या योजनेची वैशिष्ट्ये*

– दर्जेदार शिक्षण आणि शिक्षण प्रक्रियेच्या विकासावर भर देणे,

– मान्यता नसलेल्या संस्थांची मान्यता सुधारणे,

– डिजिटल पायाभूत सुविधांवर भर देणे,

– मल्टीडिसिप्लिनरी मोडद्वारे रोजगारक्षमता वाढविणे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० फेब्रुवारी २०२४ रोजी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकल्पाचे डिजिटल लॉंचिंग होणार आहे.

त्याअनुषंगाने उपरोक्त योजनेची सुरुवात करण्याकरीता मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी शिक्षा मंत्रालय, उच्चतर शिक्षा विभाग, भारत सरकार यांनी व्हिडीयो कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमाचे आयोजन केले असून सदर कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मंगळवार दि. २० फेब्रुवारी रोजी, सकाळी ११:३० दुरदृश्य प्रणाली द्वारे (थेट) मार्गदर्शन करणार आहेत. तत्पूवी सकाळी ११:०० वाजता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे संबोधित करणार आहेत. धर्मेंद्र प्रधान, शिक्षा मंत्री, भारत सरकार यांनी आमंत्रित केल्यानुसार सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे आभासी पध्दतीने उपस्थित राहून संबोधित करण्याची शक्यता आहे.

त्या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने सुमानंद सभागृह ,आरमोरी रोड, गडचिरोली येथे तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सरदार पटेल महाविद्यालयात २० फेब्रुवारी, २०२४ रोजी, सकाळी ११ वासता

कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था केलेली आहे. ऑनलाईन कार्यक्रमाची

लंিक https://pmindiawebcast.gov.in ही आहे.

होणा-या कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ गोंडवाना विद्यापीठाशी सलंग्नित असलेल्या महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी , सर्व विद्यार्थी यांनी घेण्याचे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले शिवरायांना अभिवादन

Tue Feb 20 , 2024
– शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती उत्सवामध्ये सहभाग नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (सोमवार) शहरातील विविध ठिकाणी आयोजित शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. उत्तर नागपुरातील बोखारा फाटा (कोराडी नाका) या ठिकाणी हॉटेल एम.एच.-३१ मध्ये शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आला. ना. गडकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण कले. यावेळी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!