संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्पंदना स्फुर्ती फायनान्शियल लिमिटेड आणि NIIT फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नान्हा गावात डिजिटल आर्थिक साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माहिती व सुत्रसंचालन NIIT फाउंडेशनचे प्रशिक्षक राजेंद्र कावळे यांनी केले. ते बँक व्यवहार, बचत, गुंतवणूक, बचत खाते, चालू खाते, प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आयुष्मान जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, एटीएमचा वापर, आर्थिक फसवणूक, फेक कॉल, केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. विशेषत: ग्रामीण भागातील लोकांमध्ये आर्थिक व्यवहार आणि डिजिटल तंत्रज्ञान आणि पैशाचे चांगले व्यवस्थापन कसे करावे याबद्दल जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सहभाग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.