– मनसे तर्फे प्रशासनाच्या विकास कामाची पोलखोल
नागपूर :- नागपूर शहरातील शनिवार च्या पहाटे 20 जुलै रोजी, सकाळी साडेपाच ते साडेआठ दरम्यान मुसळधार पावसाने भयंकर आतंक माजवला असून वाहतूक धारकांची, नागरिकांची दाणादान केली. तसेच नरेंद्र नगर, स्वावलंबी नगर, प्रताप नगर, गजानन नगर, येथील पावसाचे पाणी सगळ्यांच्या घरात शिरल्याने हाहाकार माजवलेला आहे. रिंग रोडच्या नरेंद्र नगरच्या पुलाखाली एवढ्या मोठ्या पावसात ट्रक बंद पडला अशा वेळेस लोकांची तारांबळ उडाली. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी मेट्रोसिटी म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर शहराची विकासाची पोलखोल केलेली असून फक्त करोडो रुपयांचे टेंडर पास करून विकास कामाच्या नावाने सामान्य नागरिकांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम सातत्याने सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
जागोजागी ऐन पावसाच्या तोंडावर कामे सुरू करणे ट्राफिक सुरळीत करण्याचा विचार न करणे, गर्दीच्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस ना नेमणे अशा असंख्य बाबींची पोलखोल तुषार गिऱ्हे यांनी केलेली आहे. वारंवार निवेदने देऊन देखील प्रशासनातर्फे नागरिकांच्या समस्यांवर दुर्लक्ष करण्याचे काम प्रशासनातर्फे होत आहे. एवढे विकास कामे करून देखील करोडो रुपये खर्च करून देखील एका पावसाने प्रशासनाच्या विकास कामाची पोलखोल केलेली आहे.