धोबिघाट निर्माण कार्यासाठी मंजूर 1 कोटी चा निधी तुकाराम समाज भवन साठी केला वळती
कामठी ता प्र :- कामठी शहरात विविध धर्मीय नागरिक वास्तव्यास असून शहरात सामाजिक एकोप्याचे वातावरण आहे.मागील 41 वर्षांपासून भाजीमंडी जवळ धोबीघाट असून या धोबीघाटात धोबी व्यावसायिक समाजबंधु कपडे धुण्यासाठी येत होते मात्र या धोबिघाट मध्ये अपुरे पडत असलेले दगडांची संख्या मुळे काही समाजबंधु नजीकच्या नदीवर जाऊन कपडे धुवायचे कालांतराने येथील सैन्य विभागाने नदीकडे जाण्याऱ्या मार्गावर मज्जाव केल्याने धोबीघाट वर असलेली अव्यवस्था लक्षात घेता मागील काही वर्षांपूर्वी माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धोबीघाट निर्माण कार्याच्या मागणीची दखल घेत 2018-19 मध्ये धोबिघाट निर्माण कार्यासाठी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 1 कोटी रूपयाचा शासकीय निधी मंजूर करीत नगर परिषद ला निधी देण्यात आला मात्र तत्कालीन मुख्याधिकारी ने निधी ज्या धोबीघाट निर्माण कार्यासाठी मंजूर झाला आहे त्या भाजी मंडी ठिकाणी धोबीघाट नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता ला संगीतलयाने ही निधी शासनाने परत घेत हा निधी छत्रपती नगर स्थित तुकाराम समाज भवन बांधकामासाठी वर्ग करण्यात आला .हा प्रकार धोबी समाजावर अन्याय करणारा असून शासनाने हा अन्याय थांबवून परत घेतलेला 1 कोटी रुपयांचा निधी पूर्ववत धोबोघाट बांधकामासाठी परत करावा अशी मागणी करीत महाराष्ट्र राज्य धोबी (परीट)समाज महासंघ कामठी च्या वतीने आज कामठी तहसिलदार मार्फत राज्य शासनाला सामूहिक निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना संजय कनोजिया, श्रावण केळझरकर,रमेश कनोजिया,कपूरचंद कनोजिया, किशोर कनोजिया,विजय कोंडुलवार,राजरोशन क्षीरसागर, किशोर कोतपलीवार,महेश कोतपलीवार,महेश कोतपल्लीवार,अजय मूलरवार,प्रकाश बंडीवार, उषाताई कोंडुलवार,शिलाबाई आदी उपस्थित होते