ढिवर समाज बहुउउद्देशीय संस्थेचे तहसीलदारला सामूहिक निवेदन सादर..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-आगामी गणेशोत्सव विसर्जन मध्ये सहायता करण्याची केली मागणी

कामठी ता प्र 29 :- ढिवर समाज बहुउदेशीय संस्था कामठी च्या वतीने अध्यक्ष सुभाष टोहणे यांच्या नेतृत्वात कामठी नायब तहसीलदार राजीव ब्रह्मनोटे यांना न्यायिक मागण्यासाठी आज सामूहिक निवेदन देण्यात आले. यावेळी कामठी संस्था अध्यक्ष सुभाष टोहणे, कोषाध्यक्ष योगेश दुधबावणे, सचिव रुपेश चाचेरे, उपाध्यक्ष मनोहर चांदेकर,सहसचिव विनोद टोहणे,कार्याध्यक्ष कृष्णा पारसे, सदस्य संतोष गोंडाळे, राजेश शेंडे,गणेश नगरे इत्यादिसह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

निवेदनात सांगितले की, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा आगामी गणेशोत्सव विसर्जन दरम्यान घाटावर कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी कामठी येथील ढिवर समाजातील जीवन रक्षक पथकाचे स्वयंसेवक कार्यकर्तेची निवड करण्यात यावी यासाठी व त्यांना मानधन, जीवन बीमा व जीवन रक्षक पोशाख उपलब्ध करीत स्वयंसेवकांची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी अध्यक्ष सुभाष टोहणे यांनी दिलेल्या सामूहिक निवेदनातुन केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गणेश भक्तांकडून बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी..

Mon Aug 29 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 29 :- देवाधिदेव श्री गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेले आहे.त्यामुळे यावर्षी निर्बंध उठल्याने गणेश भक्तांनी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सव सार्वजनिक मंडळाच्या वतीने गणेशभक्त मोठ्या उत्साहात गणेश उत्सव साजरा करीत असले तरी नवसाला पावणारा भगवान गणेश असल्याने काही गणेशभक्त घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करतात.त्यामुळे गणेश भक्तात यावर्षी मोठा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com