‘महा-रेशीम अभियान २०२४’चा शुभारंभ

Ø विभागीय आयुक्त आणि रेशीम संचालकांनी प्रसिद्धी रथास केले रवाना

नागपूर :- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि रेशीम संचालनालयाचे संचालक गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते आज ‘महा-रेशीम अभियान २०२४’ चा शुभारंभ करण्यात आला. रेशीम शेतीसाठी इच्छूक शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात बिदरी आणि गाडीलकर यांनी प्रसिद्धी रथास हिरवा झेंडा दाखवून रवाना करत या अभियानाची सुरुवात केली. रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे, लेखाधिकारी शुभदा चिंचोळकर, अधीक्षक के.टी.आळे आणि जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्निल तायडे आदी उपस्थित होते.

राज्यात २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधी दरम्यान ‘महा-रेशीम अभियान २०२४’ अंतर्गत रेशीमशेती विषयी जनजागृती व प्रसिद्धी अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील गावोगावी प्रसिद्धी रथाच्या माध्यमातून जनजागृती व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.इच्छूक शेतकऱ्यांनी संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयात नोंदणी करावी असे आवाहन, विभागीय आयुक्त आणि रेशीम संचालकांनी केले आहे.

NewsToday24x7

Next Post

भंडाऱ्यात अजित पवार यांच्या भाषणावेळी अचानक तरुणांचा गोंधळ

Mon Nov 20 , 2023
भंडारा :- भंडाऱ्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. विशेष म्हणजे डेंग्यू आजारातून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी आज जाहीर कार्यक्रमात भाषण केलं. अजित पवार या कार्यक्रमात काय बोलणार? याकडे अनेकांचं लक्ष होतं. त्यांनी आपल्या भाषणात सरकारच्या विविध योजनाबाबत माहिती दिली. पण त्यांचं भाषण सुरु असताना एक अनपेक्षित प्रकार बघायला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com