संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– शासकीय उपजिल्हा रुग्णालय 400 खाटांचे करा-उमेश भोकरे
कामठी :- नागपूर जिल्ह्याचे उपनगर मानले जाणारे कामठी शहरातील नागरिकांचे हित जोपासता नागपूर जिल्ह्याला दिलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कामठी शहराला देण्यात यावे तसेच कामठी शहरातील 100 खाटांचे शासकीय रुग्णालय 400 खाटांचे करण्यात यावे या मागणीसाठी समाजसेवक उमेश भोकरे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करीत आहेत .
उल्लेखनीय आहे की कामठी शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे या मागणीसाठी समाजसेवक उमेश भोकरे यांनी आजाद मैदान मुंबई येथे 24 जुलै 2023 पासून सतत तीन दिवस आंदोलन केले होते यासंदर्भात येथील लोकप्रतिनिधिंना सामूहिक निवेदन सुद्धा देण्यात आले मात्र यावर कुठलीही दखल घेण्यात आली नाही .मात्र यावर आपली हिम्मत न हारता मागणी पूर्ण करण्याचा संकल्प मनात हेरून आता कामठीत मागील दोन दिवसापासून धरणे आंदोलन पुकारले आहे.या आंदोलनात उमेश भोकरे,मुकेश इंचिलवार, पुरुषोत्तम बुराडे, उत्तम रंगारी आदी सहभागी आहेत.