नागपूर :- पोस्टे नरखेड येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता यातील आरोपी नामे- बिरबल जंगल्या सोनबरसे, वय ६५ वर्ष, रा. अंबाडा (देशमुख) हा मौजा अंबाडा देशमुख शिवार येथे मोहाफुल गावठी दारू बाळगुन विक्री करताना मिळुन आल्याने त्याचे ताब्यातून १५ लिटर मोहाफुल गावठी दारु प्रती ५० रुपये लिटर प्रमाणे एकुण कि. ७५० रु. चा. मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.
पोस्टे मौदा येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, चिरव्हा येथे आरोपी गणेश नामदेव बांते, वय ६३ वर्ष, चिरव्हा ता. मौदा हा अवैद्यरीत्या दारू विक्री करीत आहे. अशा माहितीवरून स्टाफसह जावुन त्याचे दुकानाची झडती घेतली असता आरोपीचे ताब्यातून ०९ निपा देशी दारूच्या प्रत्येकी १८० मिली एकूण १६२० मिली प्रती किमती ८० रू प्रमाणे असा एकूण ७२०/-रू वा मुद्देमाल मिळूण आला, दिनांक १८/०७/२०२४ रोजी पोस्टे खापरखेडा येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता यातील आरोपी नामे- दिलीप किशोर गणवीर, वय ५० वर्ष रा. न्यु नांदा झोपडपटटी ता. कामठी याचे दारूबाबत घराची घराडती घेतली असता त्याचे ताब्यातून नायलॉन थैलीत ११ निपा देशी प्रत्येकी १८० एम एल प्रत्येकी ७०/- रुपये प्रमाणे अशा एकुण ७७०/-रू. चा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.
दिनांक १८/०७/२०२४ रोजी पोस्टे पारशिवनी येथील स्टाफ पोस्टे परीसरात पेट्रोलींग करीत असता मुखबिरद्वारे माहिती मिळाली की, मौजा करंभाड गावात आरोपी प्रशांत राजकुमार लोहकरे, वय ३१ वर्ष, रा. करंभाड त. पारशिवनी हा आपले घरी देशी दारूची विक्री करीत आहे. अशा माहिती वरून दारूचावत घराची घरझडती घेतली असता आरोपीचे ताब्यातून २४ निपा देशी दारू भिंगरी संत्रा नं. १ च्या प्रत्येकी १८० एम एल प्रमाणे एकुण ४३२० एम एल प्रत्येकी ७० रू प्रमाणे एकुण किंमती १६८० रू. चा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करून आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.
पोस्टे कोंढाळी येथील स्टाफ पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी मनोज दशरथ शुक्ला, वय ४२ वर्ष, रा. पांजराकाटे ता हिंगणा जि. नागपुर हा मौजा पांजराकाटे शिवारात आरोपीचे शुक्ला धावा येथे अवैधरीत्या दारू विक्री करीत आहे. अशा मिळालेल्या गोपनीय माहिती वरून स्टाफचे मदतीने धाब्याची डाडती घेतली असता काउंटरचे खाली देशी दारूने भरलेल्या ९० एम एल एकुण १८ निपा ३५ रू प्रमाणे ६३०/- रू चा मुद्देमाल मिळुन आला. आरोपीविरूद्ध कलम ६५ ई मदाका प्रमाणे कारवाई करण्यात आली.