हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडपप्रकरणी जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना घेरले; तक्रारदाराचे संरक्षण करण्याऐवजी सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण का काढण्यात आले – जयंत पाटील

हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडपण्याचा मुद्दा विधानसभेत गाजला ;सभागृहात चिमटे आणि टोले…

मुंबई  – हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते मात्र उलट सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अयोग्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना सभागृहात घेरले आणि हा महत्वाचा मुद्दा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.

बीड जिल्ह्यातील आष्टी येथे अनेक हिंदू देवस्थानांच्या ट्रस्टच्या जमीनी हडप करण्याचा प्रकार घडला असल्याचे आज प्रश्नोत्तराच्या तासात जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

हिंदू देवस्थान जमीनीच्या या प्रकरणाचा तपास एसीबी करत आहे मात्र एसीबीकडून चालढकल होत आहे. गुन्हेगाराला अटक करण्यात आली नाही. हिंदू देवस्थानच्या जमिनी हडप करणे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जमिनी हडप करणारे कोणीही असो, कोणत्याही पक्षाचे असो त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. लवकरात लवकर देवस्थानांना जमिनी परत करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणीही जयंत पाटील यांनी केले.

देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर ते किती शीघ्रगतीने काम करू शकतात हे याच प्रकरणातून दिसते. विधानपरिषदेचे सदस्य प्रवीण दरेकर यांनी १८ ऑगस्ट २०२२ ला तपास अधिकारी बदलण्याची मागणी केली आणि १९ ऑगस्ट २०२२ ला नव्या अधिकाऱ्याची तिथे नेमणूक झाली. जलद काम करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांचे कौतुक असा चिमटा काढतानाच पण तपासही लवकर पूर्ण करा व दोषींना शासन करा असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

दरम्यान हा प्रकार गंभीर असून यावर निश्चितपणे कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

LIC व SBI समोर मोदी अडाणी चोर है च्या घोषना देत गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात काँग्रेस चे आंदोलन 

Thu Mar 9 , 2023
नागपूर :-आज दक्षिण नागपूर ब्लॉक काँग्रेस कमिटी 6 च्या वतीने मेडिकल चौक येथील एलआयसी कार्यालय व एसबीआय बँकेच्या समोर मोदी अडाणी चोर है च्या घोषणा देत LIC डुबवणाऱ्या मोदी अडाणी च्या विरोधात काँग्रेस नेते गिरीश पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी रवींद्र भोयर, योगेश गुड्डू तिवारी, सतीश होले ब्लॉक अध्यक्ष सोबत ब्लॉक काँग्रेस कमेटी चे पदाधिकारी उपस्थित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com