नागझरीत पोहचली विकसित भारत संकल्प यात्रा

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृश्य प्रणाली द्वारे नागझरीकरांनी ऐकले संबोधन

– प्रतिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना लाभाचे वाटप

– आरोग्य शिबिराचेही आयोजन

लातूर :- ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आज लातूर तालुक्यातील नागझरी येथे पोहचली, यावेळी आरोग्य विभागाकडून रक्तदाब व मधुमेह प्राथमिक तपासणी तसेच आयुष्यमान कार्ड संदर्भातील माहिती देण्यात आली. ‘आपला संकल्प, विकसित भारत’ या रथाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनाही सांगण्यात आल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील गावागावात फिरणाऱ्या यात्रेला संबोधित केले. नागझरी येथे देखील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपजिल्हाधिकारी संगीता टकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहन अभंगे, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक उध्दव फड, मूल्यमापन तज्ज्ञ संजय मोरे, नागझरीचे सरपंच श्रीराम साळुंखे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लाभार्थ्यांना लाभाचे वाटप

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभार्थी शाबुद्दीन शेख यांना जिल्हा परिषदे मुख्यकार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते मंजुरी आदेश देण्यात आला. यावेळी बालाजी धोंडिबा रणदिवे, संगीता स्वामी, सुनील रणदिवे, सदाशिव स्वामी, नवनाथ जोगदंड यांचा घरकुल बांधकाम पूर्ण केल्याबद्दल गौरव करण्यात आला.

विकसित भारत संकल्प यात्रेत आरोग्य तपासणी

विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यातील 786 ग्रामपंचायतीपर्यंत पोहचणार आहे. त्याठिकाणी केंद्र सरकारच्या योजनाची माहिती देण्यात येत आहे. आज नागझरी येथे ही यात्रा पोहचली. त्यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांच्या नेतृत्वाखाली मधुमेह, रक्तदाब तपासण्यात आले. यातील काही जणांना मधुमेह असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांना पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. आयुष्यमान कार्ड बद्दलची सविस्तर माहितीही यावेळी देण्यात आली.

‘नमो ड्रोन दीदी’ योजनेची माहिती आणि प्रात्यक्षिक

भारतातील 15 हजार महिला स्वयंसहायता गटांना ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण आणि ड्रोन दिले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. ती योजना काय आहे, त्या योजनेचे अनुदान कोणाला व किती आहे, याची सविस्तर माहिती लातूर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सचिन शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी ड्रोनमध्ये पाणी, औषधाचे प्रमाण, ते ज्या पिकांवर फवारायचे आहे त्यापासून दीड मीटरपर्यंत वर असावे, त्यातून अत्यंत कमी प्रमाणात पाणी पडते, कमीतकमी दहा मिनिटात एक एकर शेताची फवारणी पूर्ण केली जाते, अशी सर्व माहिती दिली. इतर पिकांबरोबरच ऊसासारख्या पिकावर देखील ड्रोनद्वारे फवारणी अत्यंत लाभदायक ठरते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी ड्रोन उडवून शेतकऱ्यांना याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Raksha Mantri Rajnath Singh inaugurates 40th Coast Guard Commanders’ Conference in New Delhi

Thu Nov 30 , 2023
– Exhorts ICG to continue working with dedication & professionalism towards bolstering India’s coastal defences & maritime capabilities New Delhi :-Raksha Mantri Rajnath Singh has called upon the Indian Coast Guard (ICG) to continue working with dedication and professionalism towards bolstering the coastal defences and maritime capabilities of the country. Inaugurating the 40th Coast Guard Commanders’ Conference in New Delhi […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com