‘आपली बस’चे बाह्यरूप करा डिझाईन, जिंका रोख बक्षीस  

 नागपूर :- शहराची लोकवाहिनी असलेली मनपा संचालित “आपली बस” आता लवकरच नवे तंत्रज्ञान आणि स्वरूपात जनतेच्या सेवेत रुजू होणार आहे. नव्या १५९ ई-बसेस लवकरच जुन्या बसेसची जागा घेतील. महत्वाचे म्हणजे या ई-बसेसचे बाह्यरूप कसे असावे ते ठरवण्याची जबाबदारी जनतेलाच दिली जाणार आहे. नव्या ई-बसेसचे रंगरूप डिझाईन करण्यासाठी नागपूरकर जनतेकरीता मनपातर्फे एक खुली स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांकडून आलेल्या उत्कृष्ट कल्पनाचित्राची निवड आपली बसच्या बाह्यरूपासाठी केली जाणार आहे. तसेच या कल्पनाचित्राच्या रचनाकाराला १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देखील दिले जाणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपली कल्पनाचित्रे competition.nmc@gmail.com वर अथवा मनपा आणि मनपा आयुक्तांच्या सोशल मीडिया खात्यांवर पाठवायची आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन नव्या आपली बसचे नवे रूप चितारावे, असे आवाहन मनपा आयुक्त व प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नागपुरात ओमिक्रॉन बी ए ५ व्हेरियंटच्या दोन रुग्णांची नोंद

Fri Jun 17 , 2022
घाबरू नका, सतर्क रहा, लक्षणे आढळताच चाचणी करा : मनपा आयुक्तांचे आवाहन नागपूर : नागपुरात ओमिक्रॉन बी ए ५ या व्हेरियंटच्या दोन रुग्णांची नोंद झालेली आहे. कोरोनाबाधित दोन रुग्णांना ओमिक्रोन बी ए ५ व्हेरियंटची लक्षणे आढळलेली आहेत. यामध्ये ४५ वर्षीय महिला आणि आणि २७ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. या दोन्ही रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असून दोघेही घरीच उपचार घेत आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाची थोडीही लक्षणे आढळताच त्वरीत चाचणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com