संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाने काल 11 फेब्रुवारीला येरखेडा नगरपंचायतिची अंतिम अधिसूचना जाहीर करून येरखेडा ग्रा प ला नगरपंचायत घोषित केले. या आदेशानुसार नव्याने गठीत नगर पंचायतीची यथोचित रचना होईपर्यंत अधिकार व कर्तव्य पार पाडण्यासाठी कामठी तहसील कार्यालयाचे नियमित नायब तहसीलदार यांचे नियुक्ती करण्याचे आदेशीत केले त्यानुसार आज 12 फेब्रुवारीला तहसीलदार गणेश जगदाडे यांनी नियमित नायब तहसीलदार म्हणून अमर हांडा यांची येरखेडा नगर पंचायत चे प्रशासक पदी नियुक्त केले.नियुक्तीचे आदेश मिळताच प्रशासक अमर हांडा यांनी येरखेडा नगर पंचायत च्या प्रशासक पदाचा पदभार स्वीकारून प्रशासक पदी रुजू झाले. दरम्यान त्यांनी येरखेडा नगर पंचायत कार्यालयाची पूर्णता पाहणी करून उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष परिचय घेत कामाचा आढावा घेऊन कार्यालयीन कार्यपद्धती चा हितगुज साधले.
याप्रसंगी प्रशासक पदी रुजू झालेले अमर हांडा यांचे ग्रामविकास अधिकारी ,माजी सरपंच मनीष कारेमोरे,ईश्वरसिंग चौधरी,गजानन तिरपुडे तसेच कार्यालयीन कर्मचारी रामेश्वर माने,जॉनी वंजारी,सुशील धांडे,अनिल भरणे,माधुरी जागडे, रुपाली पोटभरे, श्रद्धा गजभिये,तृप्ती वाहिले,सुनील बक्सरे, अनुप नितनवरे,खालिद अन्सारी,तुकाराम नाटकर, निना पारधी ,चंदा पावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.