नागपूर :- सी-20 परिषद आयोजनाच्यानिमित्ताने मुख्य कार्यक्रम स्थळाशेजारी हस्तकलेच्या वस्तूंचे प्रदर्शनात विविध स्टॉलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देवून येथील वस्तूंची पाहणी केली.
याठिकाणी महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, महाराष्ट्र ग्रामीण जीवन ज्योती अभियान, महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ, आदिवासी विभाग, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, माता अमृतानंदमयी मठ, रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी, सत्संग फाउंडेशन आदि विविध संस्थांचे स्टॉल लावण्यात आले असून येथे जम्मू-काश्मीर , ओडिशा, मणिपूर, राजस्थान आदि राज्यांसह महाराष्ट्र आणि विदर्भातील हस्तकला मांडण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेले प्रतिनिधीसह या स्टॉलला भेट देवून पाहणी केली.