राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनेची सभा आज ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी नागपूरवरून तर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हे मुंबई वरून सहभागी झाले होते. सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठी डीपीसी मधील आर्थिक तरतुदीसाठी ही राज्य स्तरीय बैठक होती. नागपूर शहराचा उपराजधानीचा दर्जा लक्षात घेता मागणी प्रमाणे भरीव निधी देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असेल असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनेची सभा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com