उपमुख्यमंत्री फडणवीस यांची विविध गणेश मंडळाला भेट व गणरायाचे दर्शन

नागपूर :-  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठ येथील झेंडा चौक आणि गाडगा गल्ली क्र. ४ येथील गणेश मंडळाला भेट देवून दर्शन घेतले. यानंतर त्यांनी कॉटन मार्केट येथील गणेश उत्सव मंडळ, श्री.अशोकस्तंभ गणेशोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट, श्री संत गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळ, दक्षिणामुर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळ यांच्या दर्शनास नगरसेविका चेतना टांक यांच्या क्वेटा कॉलनी येथील निवासस्थानी गणरायाची पूजा अर्चा करून दर्शन घेतले.

नवीन सुभेदार ले-आऊट येथील अश्वमेध गणेशोत्सव मंडळ,खैरी कुणबी समाज गणेश मंडळ आणि दिघोरी घाट रोड येथील श्री गणेश मित्र मंडळांस त्यांनी भेट दिली आणि गणरायाची पुजाअर्चा करून दर्शन घेतले. यावेळी गणेश मंडळांकडून  फडणवीस यांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. लोकप्रतिनिधी आणि मंडळांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पूरग्रस्त भागात अन्नधान्य किट वितरणाला सुरूवात

Tue Sep 26 , 2023
– शहरात ९ हजार किट वाटणार : नुकसानग्रस्तांना आधार देण्यासाठी मनपाचे पाऊल नागपूर :- नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे अनेक घरे पाण्याखाली आल्याने जनजीवन विस्कळीत झाले. पूरामुळे बाधित व्यक्तींना आधार देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे पूरग्रस्त भागात अन्नधान्य आणि जीवनावश्यक साहित्याची किट वाटपाला सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी (ता.२५) आशीनगर झोनमधील नोगा फॅक्टरी जवळील मैत्रिका बौद्ध विहार, भीमरत्न नगर, बसोड मोहल्ला या भागांमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com