सागरी सुरक्षेसाठी पोलिस दलातील पद भरती प्रक्रिया तातडीने करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :- राज्य पोलीस दलामध्ये सागरी सुरक्षिततेसाठी असलेली पदे ही तांत्रिक स्वरूपाची आहेत. यातील सरळसेवा कोट्यातील एकूण 162 रिक्त पदांपैकी 50 टक्के म्हणजेच 81 रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून रोस्टर तपासणीनंतर इतरही पदे भरली जातील. या प्रक्रियेस गती देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य रमेश पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. तर या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रवीण दरेकर, शशिकांत शिंदे, ॲड.अनिल परब यांनी सहभाग घेतला.

राज्यातील सागरी सुरक्षेसाठी वेगवान बोटी चालविण्याकरिता पोलीस उप निरीक्षक (सेकंड क्लास मास्टर) गट-ब (अराजपत्रित) आणि पोलीस उप निरीक्षक (फर्स्ट क्लास इंजिन ड्रायव्हर) गट-ब (अराजपत्रित) ही तांत्रिक पदे आहेत. या पदांचे महत्व लक्षात घेऊन ती भरली जाईपर्यंत भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल या विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी यांची 11 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली असून याचा कोणत्याही अंमलदारांच्या पदोन्नतीवर विपरित परिणाम होणार नाही, असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबईतील सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करणार - मंत्री उदय सामंत

Fri Jul 5 , 2024
मुंबई :- मुंबई शहरामध्ये महानगर पालिका, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या माध्यमातून रूग्णालये कार्यरत आहेत. या रूग्णालयांमध्ये सद्यस्थितीत असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींची पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. मुंबईतील सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी शासन गंभीर असून आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सुचनेच्या उत्तरात दिली. यासंदर्भात सदस्य कॅ. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com