नागपूर :- नवरात्र उत्सवानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शहरातील विविध दुर्गोत्सव व रास गरबा मंडळांना भेट देऊन दुर्गादेवीचे दर्शन घेतले, आरती केली. तसेच रासगरबा खेळणाऱ्यांचा उत्साह वाढविला. यावेळी ठिकठिकाणी दुर्गा मंडळांकडून त्यांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले.
नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. या ठिकाणी अनेक जुने दुर्गोत्सव मंडळ आहेत. त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये असून रास गरबा आयोजन प्रामुख्याने अनेक मंडळाची ओळख आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हिल टॉप येथील नवदुर्गा उत्सव मंडळ, सुभाष नगर कामगार कॉलनी येथील महिला दुर्गा उत्सव मंडळ, त्रिमूर्ती नगर येथील सुराज्य महिला शक्ती रास गरबा, जलविहार कॉलनी येथील माँ अंबिका दुर्गा उत्सव मंडळ, हिंगणा रोड येथील श्री. रेणुका मंदिर संस्थान , जयताळा येथील संघर्ष नवदुर्गा उत्सव मंडळ आणि आई तुळजाभवानी मंदिर, त्रिमूर्ती नगर येथील प्रयास प्रतिष्ठान रास गरबा महोत्सव, सुजाता ले-आऊट बस स्टॉप येथील जय अंबे दुर्गा उत्सव मंडळ, सोनेगाव येथील श्री. दुर्गा मंदिर, सोमलवाडा येथील श्री. एकता दुर्गा उत्सव मंडळ, मनीष नगर येथील मनीष नगर गुजराती युवक मंडळ, गणेशपेठ येथील श्री. आग्याराम देवी ट्रस्टतर्फे अश्विन नवरात्रोत्सव निमित्त भेट, बारासिंगल युवा दुर्गा उत्सव मंडळ, घाट रोड येथील श्री.पाटीदार समाज दुर्गोत्सव मंडळ, बजाज नगर येथील नवयुवक दुर्गापुजा महोत्सव मंडळ, लक्ष्मीनगर येथील राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ, प्रताप नगर दुर्गा माता मंदिर, अजनी चौक येथील स्टार दुर्गा पुजा उत्सव मंडळ, अभ्यंकर नगर दुर्गा उत्सव मंडळ या मंडळांना भेट देत देवीची आरती करुन दर्शन घेतले.