उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते काटोल उपविभागीय पोलीस ठाणे व सदनिकांचे लोकार्पण

नागपूर  : काटोल येथील अद्ययावत उपविभागीय पोलीस ठाणे, काटोल व नरखेड येथील पोलीस सदनिकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.    काटोल येथील उपविभागीय कार्यालयात आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे आले होते. यावेळी काटोल येथील अद्ययावत उपविभागीय पोलीस कार्यालय व ठाणे, तसेच काटोल, नरखेड, कुही पारशिवनी, खापा येथील सदनिकांचे लोकार्पण करण्यात आले. काटोल येथील उपविभागीय कार्यालयाचे प्रत्यक्ष लोकार्पण तर अन्य ठिकाणचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले.

या लोकार्पण सोहळ्याला खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल देशमुख, आमदार आशिष जायस्वाल, अप्पर पोलीस महासंचालक तथा पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरींग दोरजे, पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय चांदखेडे, ठाणेदार अशोक कोळी आदींसह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.

या परिसरातील अनेक ठाण्यातील निवासी संकुलाबाबतची अनेक वर्षांची मागणी होती. उपमुख्यमंत्र्यांनी डिजिटल पद्धतीने काटोल येथील 63 पोलीस सदनिका, नरखेड येथील 61 पोलीस सदनिकांचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर परिसरातील पेट्रोलिंग गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले तर यावेळी विशेष कार्य करणाऱ्या पोलिसांचा उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

येत्या दोन महिन्यात लाभार्थ्यांना पट्टे वाटप पूर्ण करा - उपमुख्यमंत्री

Fri May 19 , 2023
शासकीय योजनांच्या अंमलबजाणीस गती देण्याचे आवाहन काटोल व नरखेड तालुक्याची आढावा बैठक नागपूर :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत लाभार्थ्यांना हक्काची घरे प्राप्त होण्यासाठी येत्या दोन महिन्यात पट्टे वाटपाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रशासनाला दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काटोल उपविभागीय कार्यालयात आज नरखेड व काटोल तालुक्यातील उपविभागीय आढावा बैठक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com