चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅण्डिगबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

मुंबई :- जपान दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशस्व‍ितेबद्दल इस्रोच्या शास्रज्ञांचे अभिनंदन केले असून हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे. भारताच्या अंतराळातील पुढील सर्व मोहिमांना चांद्रयान-3 मोहिमेमुळे बळ मिळाले आहे. भारत जगातील एक महत्त्वाचा देश बनला असून आगामी काळात जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. या मोहिमेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि खंबीर पाठिंब्यामुळे भारत अंतराळात एक शक्ती म्हणून उदयास येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात की, चांद्रयान-3 मोहीम भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाची आहे. या मोहिमेतून चंद्राचे अनेक रहस्य उलगडले जातील. आगामी काळात भारत चंद्रावर नक्की मानव उतरवेल. भारतीय शास्त्रज्ञांनी एक महत्त्वपूर्ण मोहीम पूर्ण केली आहे. भारत अंतराळात एक शक्ती म्हणून उदयास आला आहे. भारतीय नागरिक, शास्रज्ञ, तंत्रज्ञ या सर्वांचे मी अभिनंदन करतो. याबरोबरच मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर या शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे, त्यांचाही अभिमान वाटतो. या ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षीदार झालो याबद्दल जगभरातील भारतीयांचे अभिनंदन.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारतीयांची मान उंचावणारा दिवस - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Thu Aug 24 , 2023
मुंबई :- भारताच्या आकांक्षाना नवे आकाश देणारे ‘चांद्रयान ३’ आज चंद्रावर उतरले. सर्वच भारतीयांसाठी हा ऐतिहासिक क्षण होता! भारतीयांनी देखील एकत्र येऊन हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. राज्यात सुद्धा विविध ठिकाणी नागरिकांसाठी चांद्रयान ३ च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण दाखवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील नागरिकांसाठी ‘चांद्रयान ३’ च्या सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण दाखवण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com