महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर सोयाबीन, कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना राबविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा 

उमरेड :- महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे सरकार आहे. महायुती सरकारच्या उद्योग, पर्यटन, कृषी, समाजकल्याण क्षेत्रातील अनेकविध योजनांमुळे संपूर्ण विदर्भासह उमरेड परिसराचे चित्र आता पूर्णपणे बदलून जाणार आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबविण्यासाठी भाजपा महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले.

उमरेड (जि. नागपूर) मतदारसंघातील भाजपा – महायुतीचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते. आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके, माजी आमदार राजू पारवे, आनंदराव राऊत, दिलीप सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. महायुतीला पुन्हा सत्ता दिल्यास विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना 25 हजार रु. एवढा बोनस देऊ, अशी घोषणाही फडणवीस यांनी या सभेत केली .

2009 साली सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी जमिनी खरेदी केल्या होत्या. मात्र तत्कालीन सरकारने त्यांना केवळ एक लाख रुपये मोबदला दिला. आपले सरकार आल्यानंतर आपण सारे नियम बाजूला ठेवत त्यांना दोन लाख रुपये मिळवून दिले. विदर्भ प्रकल्पग्रस्तांसाठी नवीन पॅकेज दिले. आता पुन्हा सत्तेवर येताच गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन समाधानकारक पद्धतीने करणार, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

या भागात आपण एमआयडीसी सुरू करत आहोत. पण केवळ एमआयडीसी सुरू करूनच आम्ही थांबणार नाही. तर तरुणांच्या हाताला काम मिळेल अशी व्यवस्थाही करणार आहोत. या भागातील तारणा तलाव, कोलासुर टेकडी या प्रकल्पांच्या माध्यमातून पर्यटनाच्या अत्याधुनिक सोयी देत हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ करणार आहोत. केवळ उद्योग आणि पर्यटनच नव्हे तर सिमेंटकाँक्रिटचे रस्ते, पूल अशा पायाभूत सुविधाही निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले.

तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आपले सरकार आल्यावर 15 लाख रूपये बिनव्याजी कर्ज देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी कृषि पंप वीज बिल माफी, मागेल त्याला सौर पंप योजना, कृषी वीज वितरण कंपनीची स्थापना अशा अनेक योजना महायुती सरकारने आणल्या. एक रुपयात पीक विमा योजना आणून 8 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. नमो किसान योजने अंतर्गत 12 हजार रूपये दिले. महायुती सरकार सत्तेवर येताच त्यात वाढ करत 15 हजार रुपये दिले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विकसित महाराष्ट्रासाठी महायुतीला पुन्हा सत्ता द्या - जव्हार येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन 

Tue Nov 12 , 2024
मुंबई :- मोदी सरकार आणि महायुती सरकारने कायम आदिवासी, ओबीसी,मागास समाजाला न्याय देण्यासाठी काम केले आदिवासींसाठी अनेक योजना आखल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली. मात्र विरोधकांनी आदिवासी समाजाला न्यायापासून वंचित ठेवले असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. जव्हार (जि. पालघर) येथे महायुती चे विक्रमगड चे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे हरिश्चंद्र भोये यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!