उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विविध विकास कामांची पाहणी

बारामती दि. 14 : बारामती तालुक्यात सुरु असणाऱ्या विविध विकासकामांची  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. विकासकामांची गती वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

            पवार यांनी आज  मौजे कन्हेरी येथील रस्त्याचे काम, शिवसृष्टीचे काम, फळ रोप वाटिका, वातानुकूलित पॉलिहाऊस, वनविभागाचे वन उद्यान, सुरक्षा केबिन, बांबू कुटी, वृक्ष लागवड,  गौतमनगर, नक्षत्र गार्डन आणि  जळोची येथील रस्त्याच्या कामांची पाहणी  केली.

            यावेळी महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील,  मुख्याधिकारी महेश रोकडे,  गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल   तसेच  विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            पवार  म्हणाले,  शिवसृष्टीचे काम उत्तम दर्जाचे होईल यासाठी प्रयत्न करावे.  कन्हेरी येथील वन उद्यानाच्या हद्दीशेजारील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जागा देऊन सहकार्य करावे. फळ रोप वाटिकांतर्गत रस्त्याचे काम आकर्षित करावे. रस्त्याच्या दुतर्फा चांगली झाडे लावावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

येरखेड्यात भव्य कँडल मार्च ने दिला जाईल तथागत गौतम बुद्धांचा शांती व अहिंसेचा संदेश

Sat May 14 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 14:- संपूर्ण जगाला शांती व अहिंसेचा मार्ग देणारे महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 16 मे ला सायंकाळी सहा वाजता येरखेडा येथिल बुद्ध धम्म संदेश समिती च्या वतीने धम्महाविरानुवत्र बुद्ध विहार येथून भव्य कँडल मार्च काढण्यात येईल.या भव्य कँडल मार्चच्या पूर्वी सायंकाळी 4 वाजता परित्राण पाठ करण्यात येईल त्यानंतर या कँडल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!