संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– ध्यास स्वच्छतेचा …प्रयत्न पूर्णत्वाचा!
कामठी :- केंद्र शासनाच्या ‘मेरी लाईफ ,मेरा स्वच्छ शहर’या अभियानाअंतर्गत 20 मे 2023पासून शहरातील सर्व नागरिकासाठी राजीव गांधी सभागृह कामठी, हुतात्मा स्मारक कामठी ,तसेच शहरातील सर्व प्रभागात ‘रिड्यूस,रियुज व रिसायकल’अर्थात ‘आरआरआर ‘केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.यातील राजीव गांधी सभागृहातील आर आर आर केंद्राचे उदघाटन मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले .
या केंद्रात कामठी शहरातील सर्व नागरिकानी आपल्या घरातील निरुपयोगी असलेले साहित्य,जुने कपडे,पुस्तके, बॅग,खेळणी,जुने पादत्राणे,किंवा तत्सम वस्तू प्लास्टिक आदी वस्तू संबंधित आर आर आर केंद्रावर सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीत जमा करून गरुजूना देण्यास सहकार्य करावे जेणे करून सदर साहित्य गरजुना पोहोचविण्यास मदत होईल तरी या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी,महिला बचत गट, सेवाभावी संस्था यांनी प्रामुख्याने सहभागी व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी यावेळी केले.याप्रसंगी स्वास्थ्य निरीक्षक विजय उर्फ गफ्फु मेथीयां,अभियंता वीरेंद्र ढोके,सह समनव्यक अमोल कालवडकर,दर्शन गोंडाने,अनिल देशमुख आदी उपस्थित होते.
या अभिनव उपक्रमाबद्दल मुख्याधिकारी संदीप बोरकर म्हणाले की शहरातील नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी कामठी नगर परिषद प्रशासन कटिबद्ध आहे तसेच स्वच्छ,सुंदर आणि स्वस्थ कामठी साकारण्यासाठी कामठी नगर परिषद तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे,केंद्र शासनानेदेखील शहर स्वच्छतेकडे आणखी एक पाऊल उचलत ‘मेरी लाईफ ,मेरा स्वच्छ शहर’अभियान सुरू केले आहे.या अभियाना अंतर्गत रेरिड्यूस,रियुज व रिसायकल वर भर दिले जात आहे.शहरातील नागरिकांनी आपली वापरलेली जुनी पुस्तके ,प्लास्टिक,पादत्राणे,आदी निरुपयोगी वस्तू गोळा करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी व गरजुना पोहोचविण्यात सोयीचे होण्यासाठी आरआरआर केंद्रावर जमा कराव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.