नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ५ पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे सदर हद्दीत आरोपोंचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांनी माहिती मिळाली की, पोलीस ठाणे जरीपटका हद्दीतुन हद्दपार असलेला आरोपी हा पोलीस ठाणे सदर हद्दीत एच.एन. आर पेट्रोल पंपसमोर, गड्डीगोदाम चौक येथे ऊभा आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्या ठिकाणी गेले असता एक इसम पोलीसांना पाहुन पळून जात असता, त्यास सापळा रचुन ताब्यात घेतले, त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव सुमीत उर्फ जॉन वल्द सुनिल शिदि वय २९ वर्ष रा. लाल शाळेमागे, मेकोसाबाग, लुंबीनी नगर, जरीपटका, नागपूर असे सांगीतले. आरोपीला पोलीस ठाणे सदर येथे आणुन अभिलेख तपासला असता, त्यास मा. पोलीस उप आयुक्त परि, क. ५ यांचे आदेश क. ०९/२०२४ नुसार दिनांक १६.०५.२०२४ रोजी पासुन ०१ वर्षा करीता नागपूर शहर व नागपुर ग्रामीण हद्दीतुन हद्दपार केल्याचे दिसुन आले. आरोपी हा विनापरवाना हद्दीत मिळुन आल्याने, पोलीस ठाणे सदर येथे आरोपीविरूध्द कलम १४२, १३५ म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस पुढील कारवाईकामी सदर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि, राहुल शिरे, पोहवा, टप्पूलाल चुटे, नापोअं, रशीद खान व अंमलदार यांनी केली.