नागपूर :- गुन्हे शाखा युनिट १चे अधिकारी व कर्मचारी हे पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत पेट्रोलींग करीत असता, त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे खात्रीशिर माहिती वरून सापळा रचुन आय. टी. पार्क परीसर मेन रोडवर इनफिनीटी टॉवर जवळ आरोपी हद्दपार इसम नामे सम्म उर्फ योगा संतोष दाने, वय २३ वर्ष, रा. सुभाष नगर, गल्ली नं. ०२. प्रतापनगर, नागपूर यांस ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता, त्याचे कमरेत एक लोखंडी चाकू किंमती १००/- रु. चा मिळून आला. आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे प्रतापनगर येथे कलम १४२ १३५ पोका, सहकलम ४. २५ भाका, अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपीची अधिक सखोल विचारपुस केली असता आरोपनि पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत प्लॉट नं. ५३, कावळे ले-आऊट, येथे दिनांक १३.०८.२०२३ रोजी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. नमुद गुन्ह्याबाबत खात्री केली असता आरोपीने फिर्यादी सुरज नंदकिशोर वर्मा, वय ३८ वर्षे, रा. प्लॉट नं. ५३. कावळे ले-आऊट, हे घराला कुलुप लावुन परीवारासह देवदर्शनाला गेले असता, आरोपीने त्यांचे मुख्य दाराचे कुलूप तोडुन, बेडरूममधील आलमारीतून रोख ८०,०००/- रु. चोरून नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोलीस एम.आय.डी.सी. येथे कमल ४५४, ४५७, ३८० भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचे ताब्यातून गुन्हयातील चोरी गेलेले रक्कमेपैकी ४०,०००/- रू. तसेच गुन्हा करतेवेळी गुन्हयात वापरलेला अॅक्टी मोपेड गाडी क्र. एम. एच.३१ एफ.एम. ५०५६, किंमती ८०,०००/- रु. असा एकुण १,२०,०००/- रू चा मुद्देमाल जत करण्यात आलेला आहे. अटक आरोपीला मुद्देमालासह पुढील कार्यवाहीस्तव एम.आय.डी.सी. पोलीसांचे ताब्यात दिलेले आहे.
वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, पोलीस उप-आयुक्त (डिटेक्शन), यांचे मार्गदर्शना खाली पो.नि. सुहास चौधरी, पोहवा नूतनसिंग छाडी, विनोद देशमुख, सुनित गुजर, नितीन वासनिक, नापेअ. अजय शुक्ला, सोनू भावरे, शिवशंकर रोठे, शरद चांभारे, योगेश सातपुते यांनी केली आहे.