दोन आरोपीस हद्दपार

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील दोन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आरोपीना हद्दपार करण्यात आले असून हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीमध्ये मोहम्मद हुसेन उर्फ बंटू मोहम्मद बशीर वय 32 वर्ष राहणार मदन चौक कामठी तसेच सचिन उर्फ वांग्या राकेश कुमरे वय 22 वर्षे रा दुर्गा चौक कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवनियुक्त ठाणेदार दीपक भिताडे यांनी जुनी कामठी पोलीस स्टेशन परिसर हा नागरिकांच्या हितासाठी गुन्हेगारी मुक्त करणे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना समज देण्यासह पोलीस खाक्याचा वापर करून वाल्याचा वाल्मिकी करण्याचा मानस करून बसले आहेत परिणामी जुनी कामठी पोलिस हद्दीत पोलिसांचे धाडसत्र सुरू झाले आहेत. या पोलीस स्टेशन हद्दीतील गोवंश तस्करी, जुगार सट्टा ,गांजा यासह एम डी विक्री च्या अवैध व्यवसायिकावर धाड घालून गुन्हे दाखल करण्याच्या कारवाहिला गती देण्यात आली आहे ज्यामुळे अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तसेच नुकतेच एम डी तस्करबाजावर जुनी कामठी पोलिसांनी धाड घालण्यात यश गाठले असून पाच आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून याचा मुख्य सूत्रधार लवकरच अटक करण्यात येणार असून एम डी प्रकरणाचे एक मोठे गौप्यस्फोट होणार असून मोठ्या संख्येतील आरोपी अटक होण्याच्या मार्गावर असल्याने एक मोठे रॅकेट उघडकीस करण्यात पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांना यशप्राप्त होणार आहे.

जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे. परिसरात कायद्याचे राज्य निर्माण होत गुन्हेगारांवर अंकुश लावण्यासाठी पोलिस निरीक्षक दीपक भिताडे व सहकारी पोलिसांनी कंबर कसली असून अवैध व्यवसायिकांच्या मुसक्या बांधणे सुरू केले आहे. त्यानुसार पोलीस उपायुक्त श्रवण दत्त यांच्या आदेशानुसार आरोपी मोहम्मद हुसेन उर्फ बन्टु मोहम्मद बशीर वय 32 वर्षे रा मदन चौक कामठी यास कलम 56(1)(a)(b) अन्वये एक वर्षासाठी कामठीतुन हद्दपार केले असून सदर आरोपीस त्याचे मावस भाऊ नामे मो. असिफ मो. असलम रा. रुहीखैरी पो. ठाणे बुट्टीबोरी नागपूर ग्रामीण याचे कडे 01 वर्षाकरिता तडीपार कालावधीसाठी सोडण्यात आले आहे. तसेच आरोपी सचिन उर्फ वांग्या राकेश कुंबरे वय 22 वर्ष राहणार दुर्गा चौक प्रांजल दवाखान्याच्या मागे कामठी यास कलम 56(1)(a)(b) अन्वये दोन वर्षासाठी हद्दपार केले असून सदर आरोपीस त्याचे नातेवाईक नामे रवींद्र देवचंद शरणांगत वय 42 वर्ष राहणार डोंगरी गाव तालुका रामटेक पोलीस ठाणे रामटेक यांच्या ताब्यात देऊन दोन वर्षाकरिता यांच्या स्वाधीन केले आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त यांच्या आदेशानुसार एसीपी नलवाडे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोणतेही मोबाईल कवरेज नसणा-या देशातील 28 हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून थेट 4 जी मोबाईल सेवा देण्याची सुरुवात

Sat Feb 4 , 2023
– मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांची माहिती नागपूर :- देशातील अशा गावांमध्ये ज्या गावात कुठल्याही कंपनीच्या मोबाईलचे कव्हरेज किंवा सेवा उपलब्ध नाही अशा 28 हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून थेट 4 जी मोबाईल सेवा देण्याची सुरुवात ‘4 जी सॅच्युरेशन प्रकल्पा ‘ अंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती भारत संचार निगम लिमिटेड –बीएसएनएल, नवी दिल्लीच्या कार्पोरेट कार्यालयाच्या मानव संसाधन विभागाचे संचालक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com