नागपूर :- राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष प्रश्नात पवार, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर यांच्या मार्गदर्शनात व युवक अध्यक्ष विशाल खांडेकर यांच्या नेतृत्वामध्ये महानगरपालिका उपायुक्त रंजना लाडे यांना निवेदन देऊन धडक मोर्चा काढण्यात आला.
यावेळी युवक अध्यक्ष विशाल खांडेकर यांनी सांगितले की इंदोर शहरातून व इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे भिकारी नागपुरात, रेल्वे स्टेशन, कॉटन मार्केट, व इतर नागपूर शहरातील जागेवर अनेक ठिकाणी आपला डेरा टाकलेला आहे. या भिकाऱ्यांमुळे नागपूर शहरातील सामान्य नागरिकांना, तसेच इतर राज्यातून येणाऱ्या प्रवासांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. या भिकाऱ्यांकडून भीक मागत असताना लोकांशी अरे-रावी छिना-छपटी शिव्या गाडी केली जात आहे. जर नागरिकांनी त्यांना भीक नाही दिलं त्यांच्या गाडीवर थूकणं, शिव्या गाळी करण, छिना चपटीच काम या भिका ऱ्या कडून होत आहे. महानगरपालिका आपले डोळे बंद करून हे सगळं पाहत आहे का? व यामध्ये महानगरपालिकांचा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? असा थेट आरोप युवक अध्यक्ष विशाल खांडेकर यांनी लावलेला आहे.
2023 मध्ये जी 20 आले होते तेव्हा नागपूरचे सर्व भिकारी गायब झाले होते, आणि जी 20 संपले संपले तर ते भिकारी कुठून आले असा थेट आरोप विशाल खांडेकर यांनी लावला. जर नागपूर शहरामध्ये या भिकाऱ्यामुळे काही अपघात दूरघटना घडली तर याची जबाबदारी महानगरपालिका घेईल का? येत्या सात दिवसात नागपूर शहरातुन या भिकाऱ्यांना हद्दपार केला गेला नाही तर नागपूर शहर युवक काँग्रेस तर्फे महानगरपालिका वर भिक मांगो आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल खांडेकर यांनी दिला आहे.
यावेळी, सुनिता येरणे, अभीदत्त फाले, तानाजी वणवे, रमण ठवकर, जाणबा मस्के, मोंठी गंडेचा, एकनाथ फलके, मेहबूब पठाण, जगदीश पंचबुधे, प्रबजीतसिंग बघेल, रमण खरे, नागेश देडमुठे, राहुल कांबळे, अतुल गाजघटे, प्रश्नात शेंदे, आजय मडावी, संजय बागडे, योगेश पिल्ले राजा खरे, राजू मिश्रा, रवि वाठ दीपक कुबडे संदिप कुबले, संदीप वाठ, किरण बडनवार सुशांत पाली, बाडबुदे गुरुजी, यशश्री बंसोड, सोहेल सयानी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.