राज्यपाल रमेश बैस यांचे मुंबईला प्रस्थान

नागपूर :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी नागपूर येथील विविध कार्यक्रमात शुक्रवारी सहभागी होऊन आज शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता मुंबईकडे प्रस्थान केले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या कालच्या दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपूर येथे आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,सहायक पोलिस आयुक्त अश्वती दोरजे,विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे,पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांना निरोप दिला.

शुक्रवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव सोहळा व राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या वार्षिक प्रणिती कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवे शैक्षणिक धोरण देशासाठी गेम चेंजर - उपराष्ट्रपती

Sat Aug 5 , 2023
– आर्थिक राष्ट्रवादाचा अवलंब करण्यासह नैसर्गिक संसाधनांचा किमान व काटेकोर वापर व्हावा Ø नागपूर विद्यापीठाचा शताब्दी समारंभ उत्साहात नागपूर :- नव्या शैक्षणिक धोरणात देशाच्या सांस्कृतिक वैशिष्टयांचे परिपूर्ण प्रतिबिंब असून गेम चेंजर ठरू शकणारे हे धोरण विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि क्षमतेवर आधारित तसेच वर्तमान गरजांशी सुसंगत आहे. त्याचा सर्व राज्यांनी अंगिकार करावा,असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज येथे केले. आर्थिक राष्ट्रवादाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com