मुंबई :- भंडाऱ्याच्या तहसीलदार विनीता लांजेवार यांनी नियमबाह्य कामे केल्यामुळे निलंबित करण्यात आले होते. मात्र त्यांला ‘मॅट’ने स्थगिती दिली. त्यामुळे त्यांची बदली करण्यात येईल. व विभागीय चौकशी सुरू करण्यात येत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
याबाबत सदस्य नरेंद्र भोंडेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली.
महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, शेतीला अकृषक परवानगीचे आदेश दिल्याप्रकरणी भंडाऱ्याच्या तहसीलदार विनीता लांजेवार यांना महसूल खात्याने निलंबित केले होते. या निलंबन आदेशाला मॅट ने स्थगिती दिली.
यासंदर्भात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या चौकशी संदर्भातही कार्यवाही सुरु करण्यात येईल, असे मसहूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.