सामाजिक न्याय विभागाच्या स्टॉलचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

नागपूर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कस्तुरचंद पार्क येथील मुख्य कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारी जिल्हा माहिती कार्यालय निर्मित माहिती पत्रिका किंवा माहिती पुस्तिकाचे स्टॉल लावण्यात आले होते. या स्टॉलचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख यावेळी उपस्थित होते.
यावेळी शासन निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. या वर्षी देशभरात स्वातत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाने राज्य कोरोनातून निर्बंध मूक्त होताच सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 11 दिवस विविध उपक्रम आयोजित करून साजरी केली. अनुसूचित जाती नवबौध्द घटकासह समाजातील आर्थिक दुर्बल व मागास घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वैयक्तिक व सामूहीक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत. या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा या मागचा उद्देश आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

Mon May 2 , 2022
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज ध्वजारोहण केले. यावेळी पोलीस दलाने पथसंचलन करुन मानवंदना दिली. निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, यासह अन्य यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!