– केंद्र सरकारने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंना ‘भारतरत्न’ द्या: पीरिपा
– पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी
नागपूर :- शोषित, दलित, पीडित, वंचित आणि मागासलेल्या वर्गाच्या वेदना शब्दबद्ध करून अण्णाभाऊंनी चळवळ तया केली. बहुजनांचे प्रबोधन करून त्यांना सामाजिक विषमता आणि भांडवलशाही विरुद्ध लढण्यास समतेचा मार्ग दाखवणारे क्रांतिकारी लोकशाहीर तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ डॉ. अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील कोहिनूर होते. आपल्या अजरामर साहित्यातून देशासह जगात परिवर्तन घडून आणणारे अण्णाभाऊंनी साहित्य लेखानातून वास्तववादी नायक उभे केलेत. अण्णाभाऊंचे साहित्य शोषित, वंचित आणि कष्टकऱ्यांची व्यथा-वेदना मांडणारे होते. त्यामुळेच त्यांना लोकशाहीर ही पदवी मिळाली. रशियन महासत्तेने त्यांना भारताचा ‘मॅक्सिम ग्रॉर्की’ असे संबोधले होते. साहित्यरत्न अण्णाभाऊं सारख्या महान व्यक्तिमत्त्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे लोकशाहीर आणाभाऊ साठे यांची 104 वी जयंती निमित्त दीक्षाभूमी चौक येथील त्यांच्या पुतळ्याला राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जयदीप कवाडे बोलत होते.
याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे प्रदेश संघटक कपिल लिंगायत, प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी, नागपूर शहर अध्यक्ष कैलास बोंबले, जेष्ठ नेते अजय चव्हाण, युवक शहर अध्यक्ष सोहेल खान, दक्षिण पश्चिम नागपुर अध्यक्ष स्वप्निल महल्ले, दिलीप पाटील, बाळू मामा कोसमकर, प्रकाश मेश्राम, बाबा बोरकर, बाळू भंडारे, करण बागडे, विक्की बनकर, अमित यादव, सुमित डोंगरे, हिमांशू मेंढे, आयुष दहिवले, महावीर पाल, कुशिनारा सोमकुवर, महेंद्र नागदिवे, भिमराव कलमकर, अजय चव्हाण, शैलेन्द्र भोंगाडे, प्रज्योत कांबळे, अस्मिता जयदीप कवाडे, महिंद्र पावडे, डेनी सोमकुंवर, कुणाल मेश्राम, रोशन तेलतूमड़े, दिनेश मोटघरे, विजय अंडस्कर, योगेंद्र कन्हैरे, राहुल मेश्राम, कौस्तुभ चौधरी, विजय बवाने, अजय ब्राम्हणे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, आणाभाऊ हे केवळ दीड दिवस शाळेत गेले. मात्र त्यांनी लिहिलेले साहित्य जगभरातील उच्च शिक्षणकांना मानवी हक्कांचे धडे शिकवत आहे. अण्णाभाऊ लिहिलेली फकीरा कादंबरी, वारणेचा वाघ, अलगुज अश्या अनेक कादंबरी पुस्तके प्रचंड गाजली. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भरीव योगदान दिले. दलित पद दलितांचे जीवनमान लेखणीतून चित्रित केले. ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले आम्हा भीमराव’ असे आपल्या काव्यातुन समस्त मातंग सह वंचित समाजाला संदेश अण्णाभाऊंनी दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या मार्ग अवलंबण्याचे अण्णाभाऊ यांनी मातंग समाजाला दिला. असे महान कार्य करणारे अण्णाभाऊंना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे.
जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी जाहिर करा
त्याचबरोबर अण्णाभाऊ यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी असते. त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात यावी. याशिवाय क्रांतीवीर लहूजी वस्ताद यांची जयंती 14 नोव्हेंबर रोजी असते. या दिवशीही सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे सरकारला पत्राद्वारे करण्यात आल्याचेही जयदीप कवाडे यावेळी सांगितले. अश्या या महान लोकशाहीराला देशभरात संपूर्ण आंबेडकरी-रिपब्लिकन चळवळीच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे. केंद्र व राज्य सरकार मातंग समाजाच्या पाठिशी आहे. मातंग समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महायुती सरकार नेहमीच प्रयत्नशील आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळण्याची प्रलंबित मागणी केंद्र सरकार पूर्ण करणार असा विश्वासही जयदीप कवाडे यांनी यावेळी व्यक्त केले.