नागपूर :- वकिलांच्या सुरक्षिततेसाठी असा कोणताही कायदा सरकारने तयार केला नाही. वकीलांवर होणाऱ्या हल्ल्या संबंधित हल्ले होत असल्यामुळे त्यावर अंकुश घालण्यासाठी ऍक्ट प्रोटेक्शनची नितांत आवश्यकता आहे. यातील ॲक्ट मध्ये वकिलांना राजकीय आर्थिक सामाजिक आणि व्यक्तिगत सुरक्षा मिळावी हेच अपेक्षित आहे. त्यामुळे येत्या 29 मार्च 2024 रोजी विदर्भ स्तरीय संमेलन वकिलांच्या द्वारे आमदार निवास सिविल लाईन नागपूर येथे विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यावेळी विविध राज्यातून पदाधिकारी, बार कौन्सिलिस, हायकोर्ट, डिस्टिक कोर्ट, फॅमिली कोर्टचे अध्यक्ष व सचिव उपस्थित राहतील. असे पत्रपरिषेमध्ये छत्रपती शर्मा यांनी सांगितले आहे. पत्रपरिषदेत ॲड. चंद्रशेखर ठाक, मृणाल मोरे, कोकिळा लवात्रे, गुणरत्न रामटेके, दीक्षा जेठानी, ए.पी. सिंह, सुनीता शिवहरे, दिलीप रामटेके, कांचन वराडे, विशाखा मेश्राम युवराज्ञनी रामटेके आणि विलास राऊत, प्रदीप जयस्वाल उपस्थित होते.