गौतम नगरात स्ट्रीट लाईट लावण्याची माजी नगर सेविका संध्या रायबोले यांची मागणी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-प्रभाग 15 तील गौतम नगर येथील पोरवाल महाविद्यालय ते कब्रस्थान मार्गावर इलेक्ट्रिक पोल उभारून स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

पोरवाल महाविद्यालय ते मुस्लिम कब्रस्थान मार्गावर स्ट्रीट लाईट नसल्याने अंधार असतो, नागरिकांना येण्या जाण्यास अडचण होते, मुस्लिम बांधवांना कब्रस्थानात डोला नेण्यासही त्रास होतो पावसाळ्यात हा त्रास आणखी वाढतो येथे महाविद्यालय, शाळा, असल्यामुळे इलेक्ट्रिकल पोल सह स्ट्रीट लाईट लाऊन देण्याची मागणी माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी केली आहे

निवेदनावर गौतम नगरातील धर्मपाल नागदेवे, मिथुन चांदोरकर,रोहन देशभ्रतार, धम्मदिप शेंडे,सुबोध चांदोरकर,वसंत गजबे,विशाल डांगे,विनय फुले, शेखर वासे,राजश्री रंगारी, उमा लोणारे, वैशाली गजभिये, सुरेखा बड़गे, आम्रपाली गजबे, लता वंजारी, बबिता रामटेके, आशा गजबे, वंदना रंगारी, शिल्पा गजभिये, सुजाता वांद्रे, प्रिया चहांदे, आदीच्या स्वाक्षरी आहेत

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देश उन्नत आणि सक्षम करण्यासाठी मोदींचे नेतृत्व बळकट करा, भाजपच्या विविध आघाडी मेळाव्यात सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

Sat Jun 17 , 2023
मनासा (मध्य प्रदेश) :-विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी आणि जागतिक स्तरावर भारताला प्रत्येक क्षेत्रात “नंबर वन” करण्यासाठी नवीनतम संकल्पनांसह अविश्रांत प्रयत्न सुरू केले आहेत; देश उन्नत आणि सक्षम करण्यासाठी त्यांचे नेतृत्व बळकट करण्याची जबाबदारी भाजपच्या कार्यकर्त्यांची असून त्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन राज्याचे वने, सांकृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मंदसौर लोकसभा मतदार संघातील मनासा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com