‘माझी शाळा सुंदर शाळा’अभियानात दिल्ली पब्लिक स्कुल कामठी तालुक्यातून प्रथम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- राज्य शासनातर्फे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा ,सुंदर शाळा’अभियान राबविण्यात आली .त्यानुसार सदर अभियानाची केंद्र तालुका आणि जिल्हास्तरावरील मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.तालुकास्तरावर शासकीय शाळा आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळा(खाजगी )अशा प्रत्येक तालुक्यातून दोन शाळांची निवड करण्यात आली.अशाप्रकारेसदर अभियान अंतर्गत निवड झालेल्या 26 शाळेनुसार कामठी तालुक्यातुन प्रथम क्रमांकावर दोन शाळांची निवड करण्यात आली त्यानुसार (खाजगी शाळा)इतर व्यवस्थापण शाळेतून खैरी येथील दिल्ली पब्लिक स्कुल तसेच शासकीय शाळेतून पांढरकवडा जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आली.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या माध्यमातून शाळेने अधिक प्रभावी विस्तार होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्यासोबतच अध्ययन,अध्यापन प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ,पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व व्यक्तिक स्वच्छता ,चांगले आरोग्य ,राष्ट्रीय एकात्मतेची भावना ,वृद्धिंगत करन्यासाठीचे प्रयत्न ,व्यवसाय,शिक्षणाची तोंड ओळख, अंगभूत कला, क्रीडा गुणांचा विकास व्हावा यासाठी सदर अभियानाची सुरुवात करण्यात आली.दरम्यान या सर्व घटकांच्या व उद्दिष्टावर काम करत इतर व्यवस्थापन शाळेतून कामठी तालुक्यातील खैरी गावातील दिल्ली पब्लिक स्कुल तर शासकीय शाळेतून पांढऱकवडा गावातील जिल्हा परिषद शाळेने कामठी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. दरम्यान कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले गटशिक्षण अधिकारी संगीता तभाणे,केंद्र प्रमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यानी शाळेचे तालुकास्तर प्रथम विजेता प्राप्त दोन्ही शाळेचे अभिनंदन केले आहे.’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालकवर्ग, पालक संघ आणि विद्यार्थ्यांनी वेळोवेळी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

फसवणुक करणाऱ्या आरोपींना अटक

Thu Feb 29 , 2024
नागपूर :- फिर्यादी राजु शिवचरण श्रीवास, वय ५२ वर्ष, रा. फ्लॅट नं. १०८४, विनोबा भावे नगर, यशोधरानगर, नागपूर यांच्या पत्नीचे दोन वर्षा पूर्वी आजाराने निधन झाल्याने फिर्यादी यांनी दुसऱ्या लग्नाकरीता शादी डॉट कॉम या संकेत स्थळावर आपली नोंदनी केली. आरोपी क. १) मयुरी प्रमोद काळे उर्फ गरीमा शिद वय २७ वर्ष रा. हुडेकश्वर नाका जवळ, नागपूर ही पूर्वी शादी डॉट […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com