रामटेक :- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेचा २१ व्या वर्षातील गुनिजन गौरव महापरिषद पुरस्कार निवड समितीने रामटेकचे
दीपक शंकरराव उपाध्ये यांना राज्यस्तरीय आदर्श कऱ्यगौरव समाजरत्न पुरस्कार २०२१ ने सन्मानित केलं आहे. हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडला.दीपक शंकरराव उपाध्ये हे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी नागपूर येथून सेवा निवृत्त झाले आहेत, त्यांनी अखिल पंचायत च्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांना न्याय मिळवून दिला , भ्रष्टाचार निर्मूलन समिती व ग्राहक हित संरक्षण समिती अश्या विविध माध्यमातून त्यांनी समाज सेवा केली आहे , या करीता त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे ,ह्याचे श्रेय त्यांनी आपल्या पत्नी दीपलक्ष्मी उपाध्ये यांना
दिले आहे…त्यांचा लग्नाला 39 वर्षे पूर्ण झाली असून या प्रवासात उतार चढाव आणि अनेक वादळे आली आणि गेली त्यांचा सुख दुःखाच्या मार्गात त्यांनी उत्तम साथ दिली आहे.
राज्य स्तरीय आदर्श कार्य गौरव समाज रत्न पुरस्कार मिळाला त्या बाबत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी , राज्यस्तरीय गूनिजन गौरव महा परिषद चे खूप आभारी आहे , असे दीपक शंकरराव उपाध्ये यांनी सांगितले.