दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मनपातर्फे १५ दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात आले ५.५० लक्ष रुपयांचे अनुदान

चंद्रपूर  :- महिलांना स्वयंरोजगार मिळावा व त्यामाध्यमातुन त्यांचे कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून शासनाद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान चालविले जात आहे. याअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे १५ दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास एकुण ५.५० लक्ष रुपयांचे अनुदान आतापर्यंत देण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत ज्या दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा नविन व्यवसाय सुरु करावयाचा असेल अथवा सुरु असलेल्या व्यवसायात वाढ करावयाची असेल तर २ लक्ष रुपयांचे कर्ज बँकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाते. या कर्जावर मनपा दिव्यांग कल्याण धोरण अंतर्गत २५ टक्के किंवा ज्यास्तीत ज्यास्त ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.

चंद्रपूर मनपाच्या माध्यमातुन आतापर्यंत १५ दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असुन त्यांना एकुण ५.५० लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. ज्यास्तीत ज्यास्त दिव्यांग व्यक्तींनी व्यवसायाला सुरवात करून आत्मनिर्भर व्हावे व आपल्या कुटुंबाला हातभार लावुन आर्थिक प्रगती व्हावी हा या मागचा उद्देश आहे.

ज्या डियांग व्यक्तींना नविन व्यवसाय सुरु करावयाचा असेल अथवा सुरु असलेल्या व्यवसायात वाढ करावयाची असेल त्यांनी कर्ज घेण्याकरीता व अधिक माहितीकरीता मनपा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ( बीपीएल ऑफीस ),सरकारी दवाखान्यामागे,कस्तुरबा रोड ज्युबली शाळेसमोर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचा आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुख्य नाली के कांक्रिटीकरण व अन्य कार्यों का सरंपच साबळे ने किया भूमिपूजन

Thu Jul 6 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – रनाळा के न्यू कॉलोनिवासियों को मिलेगी सीमेंट सड़क कामठी :- कामठी तहसील अंतर्गत आने वाली रनाळा ग्राम पंचयात के तहत न्यू कॉलोनी में गुरुवार को सीमेंट सड़क व मुख्य नाली का सीमेंट कांक्रिटीकरण कार्य का भूमिपूजन रनाळा ग्राम पंचायत के सरपंच पंकज साबळे के हाथों भूमिपूजन किया गया. इससे स्थानीय निवासियों को सड़क और नाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com