संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या विकतुबाबा नगर परिसरात एका 14 वर्षोय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अऱ्याचार करून जीवानिशी ठार केल्याची घटना सन 2014 मध्ये घडल्याने कामठी शहरात नेहा चव्हाण हत्याकांड चांगलेच गाजले होते यातील पीडित मृतक नेहा चव्हाणची आई नेहमीच मानसिक तणावात राहत होती .10 वर्षे लोटूनही मानसिक तणावातून बाहेर न गेल्याने काल सकाळी साडे दहा वाजता मृतक नेहा चव्हाण च्या आईने राहत्या घरात काल सकाळी साडे दहा दरम्यान घराच्या छताच्या लोखंडी हुक ला गळफास घेऊन आत्महत्या करीत जगाचा कायमचा निरोप घेतला आत्महत्या करणाऱ्या मृतक नेहा चव्हाण च्या आईचे नाव भूमिका वीरेंद्र चव्हाण वय 45 वर्षे रा विकतुबाबा नगर कामठी असे आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करीत नवीन मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.