संदीप कांबळे,कामठी
भाजपा अनुसूचित जाती आघाडी ची मागणी 3 कोटी 85 लक्ष रुपयाचा निधी परत जाण्याची भिती
कामठी ता प्र १६ मार्च – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत मंजूर झालेल्या कामठी शहरातील विकास कार्यांना तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती आघाडीचे कामठी शहर अध्यक्ष विक्की बोंबले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ विजया बनकर यांना निवेदनाद्वारे केली आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत कामठी शहरातील प्रभाग ३,८,११,१३,१४,१५ आणि १६ मध्ये विविध ठिकाणी सिमेंट रस्ता,नाली,नाली कव्हर,पेविंग ब्लॉक लावणे,सुरक्षा भिंत,सिमेंट फ्लोरिंग या विविध बांधकामाला तांत्रिक मान्यता मिळाली असून नगर परिषद कामठी च्या पत्र क्र ४०७७ दिनांक ०१/१२/२०२१ नुसार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय मान्यता साठी प्रस्ताव सादर करण्यात आला.
अडीच महिने उलटून अद्यापही या विकास कार्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली नाही आर्थिक वर्ष संपण्यास १० दिवस शिल्लक असून प्रस्तावित विकास कार्यांना प्रशासकीय मान्यता न मिळाल्यास हा निधी परत जाण्याची भिती आहे.
कामठी शहरातील दलित वस्तीतील विकासकामांना प्राधान्याने प्रशासकीय मान्यता देऊन विकास कार्याला गती द्यावी अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती आघाडी च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी भाजपा कामठी शहर महामंत्री उज्वल रायबोले, भाजपा कामठी शहर उपाध्यक्ष जितेंद्र खोबरागडे,भाजपा अनुसूचित जाती आघाडी कामठी शहर महामंत्री महेंद्र वंजारी, बिरजू चहांदे, अवि गायकवाड,नितेश बढेल उपस्थित होते.
निवेदनाच्या प्रती पालकमंत्री डॉ नितीन राऊत, विधान परिषद सदस्य आ चंद्रशेखर बावनकुळे, विधानसभा सदस्य आ टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी आर विमला, जिल्हा नियोजन अधिकारी ,मुख्याधिकारी संदिप बोरकर आणि तहसीलदार अक्षय पोयाम यांना देण्यात आल्या.
बॉक्स-पालकमंत्री डॉ नितिन राऊत यांनी व्यक्तिशः लक्ष घालून प्रशासकीय मान्यता मिळवून द्यावी ही विनंती आहे, ८ दिवसात प्रशासकीय मान्यता न मिळाल्यास भाजपा अनुसूचित जाती आघाडी च्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल.