– शहरातील अंतर्गत रिंग रोडवरील प्रवाशांसाठी विशेष सेवा
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘आपली बस’ची रिंग रोडवर विशेष चक्री सेवा मंगळवार २९ ऑगस्टपासून सुरू होत आहे. शहरातील अंतर्गत रिंग रोडवरून ही सेवा सुरू होणार असून या विशेष सेवेचा लाभ प्रवाशांनी घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
मनपाच्या ‘आपली बस’ परिवहन सेवे अंतर्गत मार्ग क्रमांक १४ वरून बस चक्री सेवा सुरू राहिल. मंगळवारी सकाळी ७.१५ वाजतापासून ही सेवा सुरू होईल. सकाळी ७.१५ वाजता ऑरेंज सिटी स्ट्रीट डेपो हिंगणा ते हिंगणा नाका, ७.३० वाजता हिंगणा नाका ते वासुदेव नगर मेट्रो स्टेशन, सकाळी १० वाजता वासुदेव नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा नाका, दुपारी २.५० वाजता हिंगणा नाका ते वासुदेव नगर मेट्रो स्टेशन, सायंकाळी ५.२० वाजता वासुदेव नगर मेट्रो स्टेशन ते हिंगणा नाका आणि सायंकाळी ७.३५ वाजता हिंगणा नाका ते ऑरेंट स्ट्रीट डेपो हिंगणा या वेळापत्रकानुसार ही सेवा चालेल.
मनपाच्या या विशेष बस सेवेचा सदर मार्गावरील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला या सर्वांना लाभ होणार आहे. नागरिकांनी देखील या विशेष चक्री बस सेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.