महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण जनतेला चिंतन करायला लावणारे!

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही बंड झाले.अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तर संजय बनसोडे कॅबिनेट मंत्री झाले. भाजपासोबत राष्ट्रवादी नेत्याने शिंदे शिवसेनेने उपस्थित केलेला हिंदुत्वाचा मुद्दा मागे पाडला.अजित पवारांच्या राष्ट्रवादीने विकासासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.एकंदर सध्याचे महाराष्ट्राचे राजकारण राज्याच्या जनतेलाच चिंतन करायला लावणारे ठरले आहे.या विषयावर दैनिक देशोन्नतीने जनसामान्य नागरिकांचे मत जाणून घेतले.सर्वसामान्य लोकं, कार्यकर्ते,!वाचा त्यांच्याच शब्दात!महाराष्ट्रीयन राजकारणासाठी नक्कीच खेदजनक:-

आकाश भोकरे

—खरं म्हणजे अलीकडेच एका खाजगी ट्रॅव्हल्सचा सिंदखेडराजा येथे झालेल्या भीषण अपघात आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश बघितला तर अत्यंत वेदनादायी घटना शनिवारी निदर्शनास आली.या घटनेमध्ये माझ्या कामठी शहरातील कुंभारे कॉलोनी रहिवासी 20 वर्षोय रिया सोमकुवर चा समावेश होता. या दुखामध्ये एकीकडे महाराष्ट्रीयन जनता असताना या दुर्दैवी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी महाराष्ट्रातील राजकारणामध्ये अश्या प्रकारचा राजकीय भूकंप व्हावा ही एक खेदजनक घटना आहे.या घटनेमुळे सर्वसामान्य मतदारांच्या विचाराचा भविष्यमध्ये विचार केला जाणार आहे की नाही ?हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो आणि रविवारची ही राजकीय घडामोड येणाऱ्या महाराष्ट्रीयन राजकारणासाठी नक्कीच खेदजनक असल्याचा भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो.

ललित सोरमारे

राजकीय पक्षांनी आपले धोरण विचार याला अनुसरून कृती करायची असते.कार्यकर्त्यानी तत्व,निष्ठा याचा विचार करून आपले वर्तन ठेवायचे असते.महाराष्ट्रात सध्या या गोष्टीचे विसर पडल्याचे दिसून येत आहे.आपल्या राज्याला मागे खेचण्यासाठी केंद्रातून जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचे दिसून येत आहे.सामान्य जनतेचा लोकशाही आणि मतदान प्रक्रियेवरील विश्वास कायम राहावा याबद्दल कोणताही विचार न करता आज भाजपा केवळ सत्ता आणि सत्तेतून पुन्हा सत्ता हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज वाटेल त्या मार्गाने सत्ता हस्तगत करण्याचे तंत्र अवलंबीत आहे.कांग्रेस पक्ष मात्र आपल्या विचारावर आणि धोरणावर ठाम आहे.त्यामुळे महाराष्ट्राला उध्वस्त करण्याचे प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही .

देवेश ठाकरे

–या देशामध्ये भाजपकडून लोकशाहीची हत्या घडत आहे.कारण भाजपकडे स्पेशल वाशिंग मशीन असून ती फक्त भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांसाठी ठेवली आहे.कारण आता मात्र नक्की सिद्ध झाले आहे की अजित पवार गट व एकनाथ शिंदे यांच्या गटाची गद्दारी म्हणजे फक्त स्वार्थासाठी हे सिद्ध झाले आहे.

विकासासाठी नव्हे ईडीच्या धास्तीनेच बंडखोरी -काशिनाथ प्रधान

—शिवसेने नंतर राष्ट्रवादीतही बंड झाले .अजित पवार उपमुख्यमंत्री तर काही मंत्री झाले खरे पण हे विकासासाठी नव्हे तर ईडी सीबीआयच्या भीतीने हे सगळे बंडखोर भाजपच्या वळवणीला गेले आहेत.शिंदे गट यांचा हिंदुत्वाचा मुद्दा आणि पवार गट यांचा विकासाचा मुद्दा हा फक्त देखावा आहे.गुजरातला गेलेले प्रकल्प हे पवार गटातील विकासपुरुष महाराष्ट्रात परत आणतील का?हा खरा प्रश्न आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

1988 के विद्यार्थी द्वारा शिक्षको का सत्कार

Tue Jul 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- लाला ओली स्थित शिक्षक सहकारी माध्यमिक शाला के सन 1988 मे शिक्षा लिये विद्यार्थीयो द्वारा गुरूपौर्णिमा के पावन पर्व पर 35 वर्ष पूर्व जिन शीक्षको द्वारा स्कुल मे शिक्षा दी गई उन शिक्षको को आमंत्रित किया गया जिनमे रामनाथ शुक्ला, भट्टाचार्य, कनोजिया , डोलिया , और शिक्षिका मे चेट्टी , घोषाल , नेरुला , […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com