मदन गडकरी यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमी ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकली सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या शोकभावना

नागपूर : ‘पोहा चालला महादेवा’ सारख्या अजरामर नाट्यकृतीने महाराष्ट्राच्या रंगभूमीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ रंगकर्मी मदन गडकरी यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमी ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकली असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, या शब्दात राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

मदन गडकरी यांनी जवळपास सात दशके रंगभूमीची सेवा केली. त्यांच्या तालमीत तयार झालेले अनेक कलावंत आज मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यांच्या निधनाने वैदर्भीय रंगभूमीने जुन्या पिढीतील मार्गदर्शक गमावला आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

देशमुख यांचा स्मृतिदिन साजरा

Tue Dec 20 , 2022
बेला : लोकजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ,राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक तथा पंचक्रोशीतील शिक्षण महर्षी दिवं. चंपतरावजी देशमुख यांचा प्रथम स्मृतिदिन लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील मुलेवार होते. मंचावरील अतिथी प्रा. नितीन पुरी, पर्यवेक्षक मिलिंद शाव, लक्ष्मण खोडके गणेश लांबट आरती मुलेवार यांनी आपल्या कविता व भाषणातून देशमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com