नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत राहणारे ५५ वर्षीय फिर्यादी, यांची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही दिनांक ०५.१०.२०२३ रोजी राहते घरून कोणाला काहीही न सांगता निघुन गेली. ती घरी परत न आल्याने, तिचा शोध घेतला असता ती मिळुन आली नाही, तिला कोणीतरी अज्ञात आरोपीने फुस लावुन पळवून नेले, अशा फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे कलम ३६३ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे समांतर तपासात गुन्हेशाखा, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहीतीवरून व तांत्रीक तपास करून, नमुद मुलगी ही उत्तर प्रदेश, वांभा येथे असल्याचे निष्पन्न केले. नमुद मुलगी ही मुलगा नामे रामकेश मुन्ना गुप्ता वय २१ वर्षे, रा. जोरावरपुर, तह, कमसिन, जि. बांदा (उत्तर प्रदेश) याचेसह त्याचे घरी मिळुन आली. दोघांनाही विचारपुस करण्यात आली. दोघांनाही ताब्यात घेवुन त्याचे समुपदेशन करण्यात आले. दोघांनाही पुढील कारवाईस्तव यशोधरानगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी, सह. पोलीस आयुक्त नागपुर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक पथकाच्या मपोनि. ललीता तोडासे, सफौ. राजेंद्र अटकाळे, गजेन्द्रसिंग ठाकुर, पोहवा. सुनिल वाकडे, श्याम अंगुधलेवार, दिपक बिंदाणे, पो.अं. शरीफ शेख, ऋषी डुमरे, विलास चिंचुलकर, नरेंद्र शिंगणे, मपोअं. अश्विनी खोडपेवार व पल्लवी वंजारी यांनी केली.