नागपूर, ता. ११ : नागपूर महानगरपालिके तर्फे शुक्रवारी (११ फेब्रुवारी) रोजी १० प्रतिष्ठान विरुद्ध कारवाई करून ७० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत नाग रोड येथील एन.आय.टी.सभागृह, वेलवसिध्द सभागृह आणि जैन मंदीर सभागृह यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु १५,००० च्या दंड वसूल केला. कच्चीविसा लकडगंज झोन मधील अशोका ईलिते यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु १०,००० च्या दंड वसूल केला. त्याचप्रमाणे आशीनगर झोन अंतर्गत टेका नाका कामठी रोड येथील गोत्रा लॉन, प्रल्हाद आनंद लॉन आणि ऑटोमोटीव्ह चौक मधील पंजाब लॉन यांच्या विरुद्ध कोविड नियमांच्या उल्लंघन करण्याबद्दल कारवाई करून रु ३०,००० च्या दंड वसूल केला.
शुक्रवारी (ता.११) धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने धरमपेठ एन.आय.टी.कॉम्प्लेक्स येथील स्टार मेन्सवेअर वर प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली