विद्यापीठ विविध प्राधिकारिणी निवडणूकीची मतमोजणी 22 नोव्हेंबरला

सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी सुरु होणार

अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाच्या निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी पाचही जिल्ह्रांतील 63 मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सर्व मतदान केंद्रावरील सिलबंद मतपेटया विद्यापीठामध्ये पोहोचल्या आहेत. दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजतापासून मतपेटया उघडल्या जाणार असून त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.

मतपेटया उघडणे व मतपेटीतील मतपत्रिकांचा हिशेब जुळविणे यासाठी चार गटांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, मिनल मालधुरे, सहा. कुलसचिव साक्षी ठाकूर व स्मिता साठे या गटप्रमुखांच्या नियंत्रणामध्ये 40 महिला कर्मचारी कार्यरत राहणार आहे. याशिवाय मतमोजणीसाठी आठ गटांची निर्मिती करण्यात आली आहे.

गट क्र. 1 मध्ये गणक म्हणून दिपक वानखडे, तर लेखनिक म्हणून  एम.एस. तायडे, गट क्र. 2 मध्ये गणक म्हणून डॉ. अविनाश असनारे, तर लेखनिक म्हणून  मोहन डाबरे, गट क्र. 3 मध्ये गणक म्हणून शशीकांत रोडे, तर लेखनिक म्हणून जे.डी. भडके, गट क्र. 4 मध्ये गणक म्हणून  आर.एम. नरवाडे, तर लेखनिक म्हणून वाय.बी. कांत, गट क्र. 5 मध्ये गणक म्हणून विक्रांत मालवीय, तर लेखनिक म्हणून  नरेंद्र घाटोळ, गट क्र. 6 मध्ये गणक म्हणून विरेंद्र निमजे, तर लेखनिक म्हणून पी.आर. गुल्हाने, गट क्र. 7 मध्ये गणक म्हणून डॉ. दादाराव चव्हाण, तर लेखनिक म्हणून एस.डी. ठाकरे, गट क्र. 8 मध्ये गणक म्हणून ऋतुराज दशमुखे, तर लेखनिक म्हणून श्री राजेश उपाध्ये लेखनिक म्हणून काम पाहणार आहे. आठ गटांमध्ये 59 कर्मचारी मतमोजणीसाठी कार्यरत राहतील. कार्यालयीन व्यवस्था उपकुलसचिव मंगेश वरखेडे, सहा. कुलसचिव रविंद्र सयाम, प्रभारी अधीक्षक उमेश लांडगे व अधिनस्त कर्मचारी पाहणार आहे.

विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या सभागृहामध्ये तसेच ज्ञानरुाोत केंद्रातील अभ्यासिकेमध्ये मतमोजणी होणार आहे. मतमोजणीचे काम कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे व कुलसचिव तथा निर्वाचन अधिकारी डॉ. तुषार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. आज कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी मतमोजणीच्या कामासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खबरदार ...जर विना परवानगी होर्डिंग लावाल तर ..मुख्याधिकारी संदीप बोरकर

Mon Nov 21 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- येत्या काही दिवसानंतर कामठी नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार असून नववर्षाची सुरुवात सुद्धा होणार आहे तेव्हा पोस्टरवार शुभेच्छुकांचा जणू काही वर्षाव होणार असल्याने वाटेल त्या ठिकाणी नगर पोस्टर, बॅनर, होर्डिंग ची उभारणी करून देखावा करीत स्वतःची प्रसिद्धीचे चित्र निर्माण होणार असल्याचे दृष्टिक्षेपास येते मात्र हे सर्व प्रसिद्धीच्या झोकात जाहिरात होर्डिंग लावताना कामठी नगर परिषदची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!