महानगरपालिकेतील ‘कोविड सानुग्रह सहाय्य हेल्प डेस्क’ला प्रतिसाद

चंद्रपूर, ता. २० : कोविड-१९ या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना शासनातर्फे ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी  शासनाने विकसित केलेल्या पोर्टलवर ‘कोविड19’ मुळे मृत पावलेल्या व्यक्तींचे नातेवाईक, वारसांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्ज भरण्‍याकरीता मृत व्यक्तीच्या नातलगांना साहाय्य करण्यासाठी आणि सविस्तर माहिती समजावून सांगण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत तळ मजल्यावर हेल्पडेस्क स्थापन करण्यात आले आहे. या मदत केंद्रावर सोमवारी शहरातील मृत रुग्णांच्या नातलगांनी प्रत्यक्ष येऊन ऑनलाईन अर्ज भरून घेतले. कार्यालयीन वेळेत या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

कोविड-19 मुळे मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारांनी mahacovid19relief.in या संकेतस्थळावर लॉगिन करणे आवश्यक आहे. मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदारास त्याचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचे आधार कार्ड, (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात),मृत्यू प्रमाणपत्र (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) मृत व्यक्तीचे निकटचे नातेवाईक, अर्जदाराचा आधार संलग्न बँक खाते क्रमांक, अर्जदाराने खाते क्रमांक दिलेल्या बँक खात्याचा रद्द केलेला धनादेश (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) आणि रुग्णालयाचा तपशील, आरटीपीसीआर रिपोर्ट, सीटी स्कॅन रिपोर्ट किंवा ज्यावरुन त्या व्यक्तीस ‘कोविड19’ चे निदान झाले, अशी कागदपत्रे (पीडीएफ, जेपीजी स्वरूपात) अपलोड करावे. या कागदपत्राच्या आधारे अर्जदाराला स्वतःचा मोबाईल क्रमांक वापरून साहाय्य मिळविण्यासाठी  लॉगिन करता येईल.

एका मृत व्यक्तीसाठी एकाच जवळच्या नातेवाईकांना अर्ज करता येईल. अनेक नातेवाईकांनी केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून शासन निर्णयानुसार अंतिमतः मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार, अर्जदाराच्या आधार संलग्नित बॅंक खात्यात सानुग्रह साहाय्य निधी जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल. अर्ज सादर करण्याबाबत व आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती mahacovid19relief.in या पोर्टलवर डॉक्युमेंट रिक्वायर्ड या टॅबवर उपलब्ध आहे. अर्ज भरण्‍याबाबत काही समस्‍या असल्‍यास मनपा आरोग्य विभागाच्या 9823004247, 8308800276 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये इंदिरानगर व बल्लारपूर येथील चमूंना विजेतेपद

Mon Dec 20 , 2021
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर, आदर्श विद्यार्थी क्रीडा मंडळ चंद्रपूर व नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन चंद्रपूर – कामगार नेते, माजी नगराध्यक्ष स्व. रमेशभाऊ कोतपल्लीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी इंदिरानगर क्रीडा मंडळाने पुरुष गटात विजेतेपद, तर महिला गटात श्रीराम वार्ड बल्लारपूर या क्रीडा चमूने विजेतेपद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com