‘स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अभियान ‘संदर्भात समन्वय समितीची सभा

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यात 26 जानेवारी 2023 ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत राष्ट्रीय कृष्ठरोग कार्यक्रमा अंतर्गत ‘स्पर्श कृष्ठरोग जनजागृती अभियान’राबविण्यात येणार आहे.त्यानुसार 26 जानेवारीला शासकीय/निमशासकीय कार्यालय,शाळा,अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामपंचायती मध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन वाचन ,ग्रामप्रमुख /सरपंच यांचे भाषण व कृष्ठरोग बाबत प्रतिज्ञा वाचन घेण्यात येणार असून 30 जानेवारी 2023 ते 13 फेब्रुवारी पर्यंत कृष्ठरोग पंधरवाड्यामध्ये विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.या पद्धतीचे नियोजन आज कामठी पंचायत समिती सभागृहात गटविकास अधिकारी अंशुजा गराटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या तालुका स्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ठरविण्यात आले.

या सभेला तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने, वैद्यकीय अधिक्षिका डॉ दुपारे, डॉ राऊत, डॉ तिवारी,डॉ भादीकर, डॉ शबनम खाणुनी,कृष्ठरोग तंत्रज्ञ मनोहर येळे, आरोग्य सहाय्यक धिरेंद्र कुमार सोमकुवर तसेच तालुका समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्राच्या चित्ररथात अवतरणार साडेतीन शक्तिपीठे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जय्यत तयारी

Fri Jan 20 , 2023
मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी व्हावा, यासाठी सतत आग्रही राहून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी थेट बोलल्यानंतर सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ चित्ररथावर साकारण्याचे काम दिल्ली येथे युद्धपातळीवर सुरु आहे. यावर्षीच्या चित्ररथ संकल्पनेत ‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यांची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com