– माहिती विभागाचा माध्यम संवाद कार्यक्रम, 75 ते 100 मि.मी. पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, अधिकृत दुकानातूनच खते, बियाणे खरेदी करा
नागपूर : शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये दर्जेदार व उत्कृष्ट गुणवत्तेचे बियाणे व खते उपलब्ध व्हावीत, यासाठी कृषि विभाग सज्ज आहे. बोगस बियाणे, खते विक्री रोखण्यासाठी विभागीय व जिल्हास्तरावर 70 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच बियाणे व खतांच्या उपलब्धतेसंदर्भात तक्रारींचे निराकरण करण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांनी दिली.