उभ्या पिकअपला कंटेनरची धडक, एकाचा मृत्यु

– पवनी जवळील चिंधई माता मंदीर शिवारातील घटना

रामटेक :-रस्त्याच्या कडेला इंडीकेटर सुरू ठेवुन उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला कंटेनर ने मागुन जबर धडक दिल्याने पिकअप वाहनाच्या चालकाचा मृत्यु झाल्याची घटना काल दि. २६ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते ११.३० वाजता दरम्यान नागपुर – जबलपुर महामार्गावरील मौजा पवनी जवळ असलेल्या चिंधई माता परीसराजवळ घडली.

देवलापारचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविन बोरकुटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिकअप वाहन क्रमांक एम.पी.२२ जी ३६१८ हा पवनी शिवारात जबलपूर कडून नागपूरकडे जाणाऱ्या हायवे रोडचे खाली साईड इंडिकेटर लावून उभा असता जबलपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या कंटेनर मुंडा क्रमांक के ए ५१ ए जी ९७६६ व कंटेनर ट्रॉली क्रमांक के ए ५१ ए.एच. ०६१५ च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरदाव वेगाने व निष्काळजी पणाने चालवून हायवे रोडने खाली साईड इंडिकेटर लावून उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला मागून जोरदार धडक दिली. यात पिकअप वाहनामधील चालक रविशंकर प्रकाश राऊत वय 45 वर्ष राहणार पिपरवाणी तहसील कुरई जिल्हा शिवनी मध्यप्रदेश यांच्या मृत्यू झाला तसेच मेहताब निर्मल राठोड वय ४८ वर्ष राहणार पिपरवाणी तहसील कुरई जिल्हा शिवनी मध्य प्रदेश व शिवाजी रामदास राठोड वय ४२ वर्षे राहणार तुरोरी तहसील उमरगा जिल्हा उस्मानाबाद हे दोघे जखमी झालेले आहेत. देवलापार पोलिसांनी 22 / 23 कलम – 279 337 304 भादवी सह कलम 184 मोवाका नुसार गुन्हा नोंद केलेला असुन पुढील तपास सुरु आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हिंदू विद्या भवन में सावरकर को अभिवादन

Tue Feb 28 , 2023
नागपुर :- हिंदी विद्या भवन शांतिनिकेतन, हनुमान नगर में स्वातंत्रवीर सावरकर के आत्मार्पण दिवस पर अभिवादन किया गया। संस्था के अध्यक्ष व हिंदू महासभा के वरिष्ठ स्वतंत्रवीर नेता व सावरकर राष्ट्रीय स्मारक मुंबई के ट्रस्टी व पूर्व अध्यक्ष अरुण जोशी ने सावरकर के फोटो पर माल्यार्पण कर अभिवादन किया। मुख्याध्यापिका दीपिका वाट ने छात्रों को संबोधित करते हुए कहा कि […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com